PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: गेल्याच आठवड्यातली गोष्ट बामियानच्या बुद्धाचे पुनरुज्जीवन आशादायी ================================================================================ प्राजक्ता कडूपाटील on 01 March, 2011 03:30:00 AM संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या बुद्धाची अफगाणिस्तानातील बामियान प्रांतात जवळपास पंधराशे वर्षापूर्वी निर्माण केलेली दोन शिल्पे 2001 साली तालिबानी राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आली. बुद्धाच्या या 53 मीटर आणि 35 मीटर उंचीच्या दोन शिल्पांपैकी लहान शिल्पाचे पुनर्निर्माण करता येणे शक्य असल्याचे नुकतेच म्युनिच विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले. रंगेल बर्लुस्कोनी अडचणीत ================================================================================ रेश्मा भुजबळ on 22 February, 2011 06:00:00 AM करिमाच नव्हे तर इटलीतील मॉडेल नाओमी लातिजिया हिच्याशी असणा-या संबंधांमुळेही बर्लुस्कोनी यांची बरीच चर्चा झाली. बर्लुस्कोनी यांच्या रंगेल प्रवृत्तीबद्दल इटलीतील जनमानसात संतापाची भावना असून राजधानी रोममध्ये गेल्याच आठवडय़ात झालेल्या निदर्शनांत त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अण्वस्त्रनिर्मितीवर पाकिस्तानचा जोर ================================================================================ आतिश नागपुरे on 15 February, 2011 03:35:00 AM अण्वस्त्रसाठ्यात भर टाकण्याच्या हेतूने पाकिस्तानने चौथी अणुभट्टी उभारण्याचे काम सुरू केले आहे. पंजाब प्रांतातील खुशाब येथील अणुकेंद्रात हा चौथा ‘रिअ‍ॅक्टर’ उभारला जात आहे. आउट ऑफ आफ्रिका.. ================================================================================ अतिश नागपुरे on 02 February, 2011 05:45:00 AM मानवाच्या उत्क्रांतीविषयी आजवर वेगवेगळे सिद्धान्त मांडले गेले आहेत. आजचा उत्क्रांत मानव म्हणजे ‘होमो सेपियन्स’ याच्या मूळ स्थानाबद्दलही अनेक प्रवाद आहेत. ‘होमो सेपियन्स’ जगभरात अनेक ठिकाणी विकसित झाले, असे संशोधकांच्या एका गटाचे मत आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान युगाचे संकेत ================================================================================ सचिन दिवाण on 18 January, 2011 01:30:00 AM भारताच्या परिघात होत असलेल्या या घडामोडींबरोबरच दूर ब्रिटनमध्येही या विषयात होत असलेल्या संशोधनाने ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या क्रांतीचे संकेत दिले. गेल्या आठवडय़ात ‘बीएई सिस्टिम्स’ या संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणा-या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी येत्या पाच वर्षात ब्रिटनचे ‘अदृश्य’ रणगाडे प्रत्यक्ष रणभूमीवर वापरासाठी सज्ज असतील, असे जाहीर केले. आरुषीला न्याय कधी? ================================================================================ सचिन दिवाण on 11 January, 2011 04:30:00 AM मुळात आरुषीच्या हत्येने राजधानी आणि परिसरातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे पुन्हा एकदा वाभाडे निघाले. तसेच पोलिस आणि सीबीआयसारख्या देशातील ‘प्रीमियर’ तपास संस्थांच्या कार्यपद्धती, क्षमतांबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दलच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आंध्रातील उपोषणाचे राजकारण ================================================================================ अतिष नागपुरे on 27 December, 2010 05:30:00 AM राज्यातील शेतक-यांची बिकट परिस्थिती पाहता, नायडू आणि जगनमोहन यांचे आंदोलन वरवर कोणालाही योग्य वाटेल. मात्र समस्येच्या मुळाशी जाण्याची नायडू आणि जगनमोहन यांची इच्छा आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हे संकट नुसते अस्मानी नसून ते राजकीय स्वरूपाचे आहे आणि यामुळे कोणत्याही क्षणी राज्याला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागू शकते, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले आहे. तिढा सुटणार कसा? ================================================================================ सुजय शास्त्री on 13 December, 2010 08:05:00 AM टु-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जॉइंट पार्लमेंटरी कमिटी-जेपीसी) की संसदेची लोकलेखा समिती (पीएसी) यांच्यामार्फत करावी, या मुद्दय़ावर सरकार आणि विरोधक अडून बसल्याने हिवाळी अधिवेशनात सलग 21 दिवस संसदेचे कामकाज झालेले नाही. संसदेच्या इतिहासात कामकाज इतका प्रदीर्घ काळ न होण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने हा तिढा नेमका सुटणार कसा, याविषयी संदिग्धता कायम आहे. पिंगची झिंग अन् सोशल नेटवर्किंग ================================================================================ जयकृष्ण नायर on 06 September, 2010 07:10:00 AM सोशल नेटवर्किंगचे हेच माध्यम आता आणखी उपयुक्त बनत चालले आहे. केवळ संवादापुरते मर्यादित न राहता आता त्याने माहिती-तंत्रज्ञान यांच्या देवाण-घेवाणीचे दालन नेटिझन्सना उपलब्ध करून दिले आहे. याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी दिली आहे. हा तर सुपर`कट' ================================================================================ सायली परांजपे on 16 August, 2010 04:30:00 PM सुपरबगच्या फैलावाच्या धोक्यापेक्षा किंवा त्यावर कोणतंच औषध गुणकारी ठरू शकत नाही या इशा-यापेक्षा या सुपरबगचं उत्पत्तीस्थान भारत आहे, या निष्कर्षावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. देशातल्या वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते संसदतेल्या खासदारांपर्यंत सगळ्यांनी या निष्कर्षावर जोरदार आक्षेप घेतला आणि ते साहजिकही आहे.