गेल्याच आठवड्यातली गोष्ट
अंधश्रद्धा, सिक्स्थ सेन्स की आणखी काही...
19 July, 2010 08:00:00 AM
जगातील सर्वाधिक खेळल्या जाणा-या फुटबॉलचा विश्वविजेता ठरवणारी स्पर्धा नुकतीच संपली. महिनाभराचा थरार, प्रत्येक सामन्यागणिक वाढणारा रोमांच, सेकंदाच्या आत निकाल बदलवणारा खेळ अशा अनुभवाने जगभरातील फुटबॉलरसिक आणि सर्वसामान्यांनाही वेड लावले. पण ‘पायांनी खेळण्याच्या’ (फुटबॉल) या स्पर्धेत या थरारक अनुभवापेक्षाही मोठी क्रेझ राहिली ती पॉल ऑक्टोपस नावाच्या आठ पायांच्या ‘ज्योतिषी’ची. सामन्यातला विजेता कोण बनणार नि वर्ल्डकप कोण जिंकणार याचं अचूक भाकित वर्तवणारा पॉल आज सेलिब्रिटींच्या यादीत जाऊन बसला आहे. माणसांच्या जिवनाशी निगडित घडामोडींचं भविष्य सांगणारा पॉल ऑक्टोपस हा पहिलाच प्राणी नाही. पोपट, साप, कासव या प्राण्यांच्या आधारे वर्षानुवर्षे भविष्याचे आडाखे बांधले गेले आहेत. भारतास अंधश्रद्धाळू ठरवणाऱ्या पाश्चिमात्य देशांतही प्रचलित असलेला हा प्रकार अंधश्रद्धेचा की पॉलच्या ‘सिक्स्थ सेन्स’चा, हा वादाचा विषय असू शकतो. तूर्तास मात्र पॉल ऑक्टोपस, मणी पोपट आणि हॅरी मगर यासारख्या प्राण्यांची चलती आहे.
दूरदर्शी पाऊल
05 July, 2010 06:25:00 AM दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांच्या कारवायांनी कायम धगधगत असणा-या संवेदनशील काश्मीर खो-यातील लेहला जोडणा-या रोहतांग बोगद्याच्या कामाचा आरंभ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते नुकताच झाला. काश्मीर खो-यातील या खडतर भागाला देशाशी जोडण्यासाठी हिमवर्षावानंतर निरुपयोगी ठरणा-या रस्तेमार्गाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध होणार आहे....गळतीचा धडा!
21 June, 2010 08:30:00 AM अमेरिकेत तेलगळतीला कारणीभूत ठरलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमने ओबामा यांच्या डेमोक्रेटिक पक्षाला गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत 77 हजार डॉलर निधी दिला होता. हा निधी इतर तेलकंपन्यांनी दिलेल्या निधीत सर्वाधिक आहे. इतर तेलकंपन्यांनी ओबामांना सुमारे दोन लाख 86 हजार डॉलर निधी दिला होता. आता एवढा निधी दिल्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाची सुरुवातीला ब्रिटिश पेट्रोलियमला आरोपीच्या पिंज-यात बसवण्याची तयारी नव्हती. पण ही तेलगळती निश्चितच मोठी असल्याने आणि मीडिया आक्रमक झाल्याने ओबामांना हातपाय हलवावे लागले. ...‘लाल’गडाला ममतांचा सुरुंग
07 June, 2010 08:55:00 AM बदल हा सृष्टीचा नियम आहे. हवामानातील अनेक चांगल्या-वाईट बदलांचा अनुभव आपण घेत आहोतच. राजकीय स्वरूपाचा असाच महत्त्वपूर्ण बदल पश्चिम बंगालमध्ये गेल्या रविवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घडला. डाव्या पक्षांच्या या बालेकिल्ल्याला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सुरुंग लावला....माणूस देव बनला..!
26 May, 2010 11:25:00 AM गेल्या आठवडय़ात माणूस खरोखरीच देव बनला..अमेरिकेतील प्रसिद्ध जनुकशास्त्रज्ञ क्रेग व्हेंटर आणि त्यांच्या चमूने डीएनएच्या कृत्रिम साखळीच्या साह्याने जिनोम तयार करून तो एका पेशीत टाकला व कोणत्याही जीवाणूची मदत न घेता कृत्रिमपणे जीवाणूची निर्मिती करता येईल, हे सिद्ध केले...दहशतवादाची पाक शाळा...
10 May, 2010 05:30:00 AM वास्तविक 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं तडकाफडकी अफगाणिस्तानला लक्ष्य ठरवून कारवाई सुरू केली. अफगाणिस्तानात कारवाया करणा-या तालिबानींना पाकिस्तानचंच पाठबळ आहे, हे ठाऊक असूनही अमेरिकेनं पाकिस्तानकडे डोळेझाक केली. पण हीच डोळेझाक आता अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मुळावर उठली असल्याचं गेल्या दशकभरातल्या घटनांवरून दिसून येतं....न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढणार?
25 April, 2010 10:45:00 PM पैसा व सत्ता यांच्या जोरावर कोणत्याही गोष्टी कशा ‘मॅनेज’ होऊ शकतात आणि सामान्य जनता व प्रसारमाध्यमांनी मनावर घेतलं तर पैसा-सत्ता न्यायासमोर कसे निष्प्रभ ठरू शकतात, या नकारात्मक आणि सकारात्मक बाबींचा पट जेसिका लाल घटनेच्या निमित्तानं उलगडला गेला. ...मोस्ट कमेंटेड














































































































राशीभविष्य