PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: स्त्रीविधा ती विश्वमाता ================================================================================ शालिनी मेनन on 17 May, 2012 07:35:00 AM स्त्रीभ्रूणहत्या ही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, या गैरसमजुतीतून केली जात आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुलीला परक्याचं धन म्हणून डिवचणारे लोक अजूनही समाजात आहेत. त्या अजाण लोकांना कोणीतरी जाऊन समजवावं की, अशा कितीतरी मुली आहेत, ज्या काबाडकष्ट करून आपल्या आई-वडिलांना सांभळत आहेत. मुली पुढे जाऊन आई होतात. मोठय़ा कष्टांनी मुलांना वाढवतात. स्त्रीच्या रूपांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न. अस्मा, जाग्या व्हा! ================================================================================ प्रहार on 17 May, 2012 08:15:00 AM सहा दिवसांपूर्वी 11 मे 2012 रोजी सिरियाची राजधानी दमास्कस इथे बॉम्बस्फोट झाले. त्या स्फोटात 40 जण ठार झाले असून, 170हून अधिक लोक जखमी झाल्याचं राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून दाखवलं होतं. नवी शाळा ================================================================================ अनुजा संख्ये on 17 May, 2012 07:45:00 AM मूल कुटुंबात घडत असलं तरी त्याच्यावर खऱ्या अर्थाने संस्कार होतात ते शाळेत. शाळेपेक्षा अधिक अन्य कोणाशीही मुलांचा संपर्क होत नसतो. हे अनुजा संखेच्याबाबतीत हे शंभर टक्के खरं आहे. तिला कमला मेहता अंध शाळेने स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं. स्वावलंबी बनवलं. माझं बालपण.. ================================================================================ अनुजा संख्ये on 10 May, 2012 08:35:00 AM आपल्या प्रत्येकाचंच आयुष्य आई-बाबा, खेळणी, बाहुली, सवंगडी, शाळा, कॉलेज, करिअर, नोकरी याभोवती फिरतं. मात्र ज्यांना शारीरिक अपंगत्व असतं, अंधत्व असतं त्यांचं आयुष्य कसं असतं, हे प्रश्न अनेकांना पडतात. अशांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं हे नवं सदर. या सदराची पहिली मानकरी ठरली आहे अनुजा संखे. ती तुमच्यापुढे मांडेल स्वत:च्या जीवनाचा कोलाज.. सुसंवादाचा अभाव ================================================================================ संकलन : अनुजा, आदिती पराडकर, अर्चना राणे, वेद बर्वे, प्रसाद लाड, संध्या धुरी on 10 May, 2012 08:10:00 AM पती-पत्नीचं नातं हे विश्वास, समजूतदारपणा आणि पारदर्शकतेच्या पायावर उभं राहिलं गेलंच पाहिजे. तसं न झाल्यास पती-पत्नी यांच्यामधल्या साधारण वादावर निर्णय घेण्यासाठी न्यायालायाची पायरी चढावी लागते. न्यायालय पत्नीला सीतेचे दाखले देऊन तिला गप्प करतं. एक व्यक्ती म्हणून जसे पुरुषाला काही हक्क आहेत, तसे स्त्रीलाही आहेत. अशावेळी आजच्या आधुनिक युगात स्त्रीने ‘सीता’ बनून राहावं का? यावर केलेलं हे विचारमंथन. आईची किमया ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 May, 2012 07:30:00 AM मूल हे घरातच घडतं. पालकांच्या जास्तकरून आईच्याच सान्निध्यातच त्याची जडणघडण होते. आई ही आईच असते. तिला सगळी मुलं सारखीच. मुलामधलं शारीरिक अपंगत्व हा भाग तिच्यासाठी गौण असतो. अशा मुलांना वाढवताना समाज तिच्यापुढे काही प्रश्न उपस्थित करतो. त्यावर तिचं उत्तर असतं मुलातले सकारात्मक बदल. अशा आई किमयागार ठरतात. 13 मे च्या ‘जागतिक मदर्स डे’चं औचित्य साधून काही किमयागार आईंच्या या प्रतिक्रिया.. कष्टाचं फळ गोडच! ================================================================================ राजन लाड on 03 May, 2012 07:50:00 AM एखाद्या कलाकृतीमध्ये जेव्हा पिरियड ड्रामा असतो, तेव्हा त्यातली वेशभूषा करणं किंवा ठरवणं हे आव्हानात्मक काम असतं. मात्र ते आव्हान वेशभूषाकार पूर्णिमा ओक सहजतेनं पेलतात. त्यांना ‘राजमाता जिजाऊ’ या मराठी चित्रपटासाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट वेशभूषाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हा ‘कष्टांचं चीज झालं’, प्रतिक्रिया पूर्णिमा ओक यांची होती.. मैदानी खेळांचं महत्त्व ================================================================================ मानसी जोशी on 03 May, 2012 07:30:00 AM तंत्रज्ञानाच्या युगाचे प्रत्यक्ष चटके एव्हाना सर्वसामान्यांनाही जाणवू लागले आहेत. उद्याच्या पिढीच्या म्हणजेच मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर या जेटयुगातील ई-आयुधांचे अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहेत. सतत मोबाइल, संगणकाचा स्क्रीन, आयपॅड यावर असणा-या गेम्सच्या आभासी जगामध्ये रमणारी मुलं आज शारीरिक खेळप्रकार विसरली आहेत की काय, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. या व्हर्च्युअल युगात सातत्यानं वावरल्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य तर बिघडत आहे. शारीरिक हालचाल कमी होत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती देखील क्षीण होत चालली आहे. संगोपनाचा नाही निदान आरोग्याचा विषय म्हणून तरी याकडे गांभीर्यानं पाहायलाच हवं! मला भावलेली ती ================================================================================ प्रहार on 26 April, 2012 07:55:00 AM आई, बायको, मैत्रीण, मुलगी, बहीण, उद्योजिका, डॉक्टर, नर्स, समाजसेविका.. यांसारखी अनेक स्त्रीची रूपं आपल्या परिचायची आहेत. अशाविविध रूपातल्या स्त्रिला आपण वारंवार भेटत असतो. त्या विविध रूपातल्या स्त्रीचं काम, तिचं वागणं, बोलण, आचरण आपण जवळून पाहत असतो. रोजच्या जगण्यात अनेकींशी आपला संपर्क येतो. त्यातल्या काही जणीच लक्षात राहतात. त्या का राहिल्या, या मागची ही पुरुष स्पंदनं.. भटकंतीद्वारे सामाजिक बांधिलकी ================================================================================ सुवर्णा मयेकर on 26 April, 2012 07:50:00 AM महामार्गावर होणारे अपघात, दरोड्यांच्या घटना पाहता लोक एकट्याने प्रवास करणं टाळतात. मात्र मुंबईतल्या संपदा रांगणेकर आणि ज्योत्स्ना रासम या भटकंतीप्रेमींनी झायलो मोटारकारने ‘स्वर्णीम चतुर्भुज’ या महार्गावरून प्रवास केला आणि 13 राज्यांतून स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्याचा संदेश दिला..