पहिले पान | मध्यंतर | स्त्रीविधा

स्त्रीविधा

आपण कचरा खातोय

16 June, 2011 08:05:00 AM
काही फॅशनेबल फास्ट फूड जॉइंट्समध्ये जाऊन बसण्यासारखा स्टेटस सिम्बॉल नाही की आपल्या एरवीच्या राहणीमानाशी त्याचा कुठे मेळ बसत. पण रेल्वेच्या प्रवासाने एक उपरी गोष्ट आपल्या पचनसंस्थेचा भाग बनवली आहे हे खरं आहे.
image

व्हाय हिस्ट्री हॅज टू रिपीट इटसेल्फ?

09 June, 2011 07:35:00 AM क्लास बंक करून चर्चगेटच्या रंगीबेरंगी, मोहमयी दुनियेत भटकणाऱ्या आम्ही! तिच्या अस्तित्वाची कधी जाणीवच झाली नाही आम्हाला. तिच्याकडे लक्ष गेलं आणि.. माझं लेक्चरमधलं लक्ष उडालं. नजर परत परत तिच्याकडे जाऊ लागली. बुरख्याआडून तिचे डोळे जाणवायचे, गहिरे.. खोल डोहासारखे.....
आणखी वाचा

असेनात का बेस्टसेलर्स

09 June, 2011 08:00:00 AM ऑफिसला जाता जाता किंवा असंच कुठेतरी प्रवासाला निघालेल्या, कॉलेजला जाणा-या अशा मुली, बायका अवतीभवतीचं जग विसरून वाचण्यात गढलेल्या दिसतात. त्यामुळे बायका सध्या काय वाचत आहेत, अशा विषयावरचा एक सॅम्पल सव्‍‌र्हे सहज होऊ शकेल इतकी सामग्री या डब्यात सापडू शकते....
आणखी वाचा

फुलपरी

01 June, 2011 04:30:00 AM आपणही नाही का स्वीकारत चॅलेंजेस्? ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी बस/लोकल वेळेवर पकडण्याचं चॅलेंज! परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवण्याचं चॅलेंज! आयुष्य जगण्याचं चॅलेंज! प्रत्येक टप्प्यावर अडथळय़ांची शर्यत असते. कित्येक मेंटल ब्लॉक्स असतात. सारे ओलांडत पुढे जायची शर्यत लागलेली असते. या सगळ्यांवर मात करण्याची, जगायची धडपड आपणही करत असतोच. तशाच प्रकारची धडपड नेहा आणि तिची आई करत आहे. फक्त संदर्भ बदललेत जगण्याचे.. धडपडण्याचे!...
आणखी वाचा
image

वी विल मिस यू ओप्रा...

02 June, 2011 04:30:00 AM ती काही तत्त्वज्ञ नाही. पण आपल्या जगण्यातून शिकलेले धडे तिने इतरांशी दिलखुलास वाटले. आपलं आयुष्य यशस्वी बनवण्याची गुरुकिल्लीही तिला त्यातच सापडून गेली. आपल्या तत्त्वज्ञानाची योग्य किंमतही तिने ओळखली, खणखणीत वाजवून घेतली. ओप्राने आता तिच्या सुप्रसिद्ध कार्यक्रमातून निरोप घेतला आहे. तिच्या आयुष्याची कहाणी, तिच्या यशाची तंत्र आणि त्यामागची गणितं यांची चर्चाही खूप झाली आहे. छोटय़ा पडद्यावरच्या आपल्या चाहत्यांशी आपला पत्रांद्वारे संपर्क राहिलंच, याची हमीही तिने दिलेली आहे. पण हा चाहतावर्ग टीव्हीवरचा तिचा वावर तरीही मिस करणारच. जगण्याकडे कमालीच्या उत्सवी नजरेने बघणा-या या कृष्णवर्णीय बाईचा चेहरा सुंदर दिसत नाही, असं कोण म्हणेल. पण इथे सुंदरपणाची व्याख्या मात्र बदलून घ्यावी लागेल. खरं सौंदर्य नेमकं कशात असतं याची थोडीशी उकल तिच्या काही वाक्यांमध्ये सहज सापडू शकेल. ...
आणखी वाचा

नाती दृढ होताहेत

02 June, 2011 04:30:00 AM वेगवेगळ्या वयोगटांतील असूनही त्या सा-याजणी समवयस्क वाटत होत्या. सर्वाना ऐकू जातील अशा आवाजात त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. तेवढय़ात एकीचा मोबाईल वाजला. ‘अगं, आम्ही ‘किचन’मध्ये बसलो आहोत. तू तिथंच ये.. ...
आणखी वाचा
image

मुलीचा स्वीकार रूढींना नकार

26 May, 2011 08:30:00 AM जनगणनेच्या प्रत्येक निकालागणिक मुलींचा खालावत चाललेला जननदर ही काळजीची बाब बनत चालली आहे. त्यातच आता देशातल्या उच्चभ्रू समाजामध्ये दुस-या अपत्याच्यावेळी मुलगाच हवा म्हणून स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचं निरीक्षण ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये नोंदलं गेलं आहे. ‘मुलगाच हवा’ ही धारणा समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपली याचं एक कारण याच उच्चवर्गीय समाजाचं अंधानुकरण हेही आहेच. या रितीरिवाजांचा पगडा आजही समाजावर इतका आहे की, मुलींना जन्मच नाकारण्याचं प्रमाण कमी होण्याची चिन्हं नाहीत. या समजुतींना मूठमाती दिल्याशिवाय स्त्री-भ्रूणहत्येच्या समस्येवरही तोडगा सापडणं शक्य नाही....
आणखी वाचा
image

रिकामी अक्षरं, रिकाम्या पोथ्या

26 May, 2011 08:00:00 AM डब्याच्या कुठल्याही भागात बसण्याजोगी किंवा किमान व्यवस्थित उभं राहाण्यापुरती जागा मिळाली की ब-याच जणींच्या बॅगेमधून हटकून एक धुरकटलेल्या प्लास्टिकची चुरगळलेली आणि ब-याच घडय़ा घातलेली पिशवी बाहेर येते. त्या घडय़ा बराच काळ उलगडल्यानंतर त्यातून एखादी तळहाताएवढय़ा आकाराची चोपडी बाहेर निघते. ती डोळ्यांना लावून वाचन सुरू होतं. ...
आणखी वाचा
image

सामाजिक जाणिवेची हिरवाई

26 May, 2011 07:30:00 AM साता-याच्या संध्या चौगुलेंचा प्राध्यापक ते ‘झाडंवाली बाई’ असा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरू शकेल असाच आहे. समाजसेवेतल्या त्यांच्या प्रवासाला ‘हिरवाई’ नावाचं सुंदर वळण मिळालं. त्यांनी लावलेली आणि जीवापाड जपलेली झाडं जोमाने बहरत आहेत. याच हिरवाईत कातकरी मुलांसाठी ज्ञानदानाचं कामंही त्यांनी सुरू केलं आहे....
आणखी वाचा
image

आपला प्रवास ‘निर्मळ’ होवो

19 May, 2011 08:25:00 AM महिलांना जात्याच स्वच्छता, नीटनेटकेपणाची आवड असते, असं म्हणण्याचं अगदीच कारण नाही. म्हणूनच त्यासाठी लोकलमधील महिलांच्या डब्यांचं उदाहरण उपयुक्त ठरत नाही. उलट हे विधान हाणून पाडण्याचा विडा उचलल्याप्रमाणे उलट परिस्थिती इथे अनेकदा पाहायला मिळते. ही बरी गोष्ट नाही. नीट आठवलं की लक्षात येईल, रेल्वेच्या डब्यात निवडलेल्या भाज्यांचे देठ, चॉकलेट-वेफर्सचे रॅपर, फळांच्या साली, पाणी-कोल्ड्रिंकच्या बाटल्या, कागदाचे तुकडे सीटखाली टाकलेले आढळतात. तर कधी थेट सीटवरच खाद्यपदार्थ सांडलेले असतात....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 364 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड