स्त्रीविधा
गोधडी गेली सातासमुद्रापलीकडे
11 August, 2011 07:30:00 AM
प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिक कामाला महत्त्व देणा-या आणि फक्त बचतगटांच्या प्रगतीचं नाही तर संपूर्ण ग्रामविकासाचं स्वप्न पाहणा-या नीलिमा मिश्र यांनी 1800 बचतगटांच्या माध्यमातून 16 हजारांहून अधिक महिलांना स्वयंरोजगाराची आणि आत्मसन्मानाची वाटही दाखवली. यांचं काम मॅगसेसे पुरस्काराची मोहोर उमटल्याने आता कुठे प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारीबरोबरच काम करण्याची उमेद वाढली आहे, असं त्यांना वाटतंय.
अटकेपार झेंडे
11 August, 2011 08:00:00 AM राजेश्वरी आणि त्यांनी बनवलेले झेंडे अबदागि-यांना सिंगापूर इथं भरणा-या तिस-या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये झळकण्याची संधी मिळणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष महेश एलकुंचवार तसंच संयोजक संतोष अंबिके आणि राजश्री लेले यांच्या विशेष मागणीवरून या वस्तू बनवण्याची संधी राजेश्वरी यांना मिळाली. ...फाइव्ह पॉइंट समवन!
04 August, 2011 04:30:00 AM रिलॅक्स! तुम्ही सुंदर आहात हे स्वत:ला सांगा आणि शांत, सुंदर आयुष्य जगा. प्रत्येकाला खूश करण्यासाठी तुम्ही जगात आलेल्या नाहीयेत.. तुमच्याकडे ‘उदात्त’ असं जे आहे, ते जगाला देण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुमचा जन्म झालाय.. आनंदी राहणं हा तुमचा हक्क आहे.. सो, सासूबाई ओरडायच्या आधी एक झक्कास स्माइल द्या पाहू..’ ‘‘आज उपोषण करायचंय का सगळ्यांनी? पोटात कावळे कोकलतायत नुसते.. तुमच्या नादी लागलं तर जेवणसुद्धा पानात पडायचं नाहीसं दिसतंय आता.. घेते माझी मीच वाढून..’’ सासूबाई कोकलल्या.. ‘‘माझं पण घेता का जरा? पाठ दुखतेय कधीपासून.. अहो, पिंटय़ाच्या ‘इलोक्युशन’च्या लिंक डेस्कटॉपवर ठेवल्यायत.. त्याचं स्पीच तुम्ही लिहा यावेळी.. आणि हो, स्विटीचे सिव्हिक्सचे प्रश्नही घ्या पाठ करून आज.. मी आज लवकर झोपणारेय..’’ हसतच तिनं ताट पुढे ओढलं.. ...खोल समुद्रांची सम्राज्ञी
28 July, 2011 05:30:00 AM सिल्व्हिया अर्ले यांचं समुद्रसंशोधनाच्या क्षेत्रातलं कार्य अफाट आहे. खोल समुद्रात 7000 तास राहणं, समुद्रात 1000 मीटर एकटीनं डुबी घेणं, असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सागरी संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. समुद्रांतील जीवसृष्टीच्या संवर्धनाची गरज ओळखून त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. 1967 मध्ये चार महिन्यांची गरोदर असताना किंवा आज 77 वर्षाच्या वयातही सागरात डुबी मारणा-या डॉ. सिल्व्हिया यांच्या जीवनाचं सूत्रच आहे.. ‘आय ब्रीद, सो आय डाइव्ह’! ...स्लट अँड प्राऊड?
21 July, 2011 05:50:00 AM प्रश्न आहे तो ‘स्लटवॉक’ नामक प्रकारामध्ये अध्याहृत असलेली बेशरमी अंगात भिनवण्याची मोकळीक इथली किंवा कुठलीही बाई स्वत:साठी घेते का? इथे मोकळिकीचा अर्थ फक्त कपडय़ांच्या निवडीपुरताच किंवा लैंगिक स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही. त्यांना फारतर प्रतीकं म्हणता येईल.....रस्त्याचं शेवटचं टोक..
21 July, 2011 05:50:00 AM रस्त्यानं चालता चालता वाटेत एक पहाट सापडली.. दवांत भिजलेली तरी मऊ रेशमी ऊबदार.. टाकली पाठीवरल्या थैलीत.....जाणीव जागृती तरुणाईपर्यंत
21 July, 2011 05:30:00 AM लिंगनिवड विरोधी मंच, एसएनडीटी महिला विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण समिती यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून लिंगभेद आणि लिंगनिवड या संदर्भात जाणीव जागृतीपर कार्यक्रम एसएनडीटी विद्यापीठात नुकताच पार पडला. त्याचा हा वृत्तांत.....जाणीव-जागृती खरंच होतेय का?
14 July, 2011 06:30:00 AM आई होण्याचा निर्णय असो की तिला मुलीची आई न होऊ देण्याचा निर्णय, तिच्या वतीने कुणीतरी दुसरेच निर्णय घेऊन मोकळे होत असतात. निर्णयप्रक्रियेत मुलींना महत्त्वाची भूमिका मिळणं, आज सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ही स्थिती बदलायची तर कायद्यांत मूलभूत बदल होणं गरजेचं आहे....ऐकण्याची सवय चांगली!
14 July, 2011 06:30:00 AM कॉलेजवयीन मुलींपासून अगदी चाळीशी गाठलेल्या (किंवा त्यावरील वयाच्याही) अनेक जणी अशा प्रकारे कानाला इअरफोन लावून ट्रेनमध्ये दिसतात. त्यातून मनोरंजन होतं. अवांतर ज्ञानात भर पडते. इअरफोन कानाला असले की सहसा आपल्या वाटय़ाला कुणी जात नाही आणि आपल्यालाही कुणी सोबत असण्याची गरज भासत नाही. ...मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य