PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: स्वीट होम तुझे आहे तुजपाशी ================================================================================ दिलीप हर्लेकर on 18 May, 2012 07:40:00 AM सिमेंट-क्राँकिटच्या वाढत्या जंगलात छोट्या-छोट्या हिरव्या बेटांची गरज निर्माण होत आहे. या गरजेतूनच झाडांची लागवड केली जाते. सुरुवातीला प्रत्येकाचाच झाडं लावण्याचा उत्साह दांडगा असतो. झाड जगत नसल्याचं दिसतं, तेव्हा वृक्षारोपणाच्या आनंदावर विरजण पडतं. झाडं न जगण्याची कारणं निराळी आहेत. या कारणांची माहिती देणारं हे सदर. त्याच्या जोडीने बॉटल गार्डन, घरातला बगीचा, झाडं आणि घराचं सौंदर्य, पर्यावरण, शहरी शेती याचीही माहिती या सदरातून मिळेल. शुल्कांच्या घरात ================================================================================ पवन देशपांडे on 18 May, 2012 07:25:00 AM घर खरेदी करताना त्यानंतर होणारे अनेक खर्च लक्षात घेतलेले नसतात. सामान्यत: घराचा प्रति स्क्वेअर फूट भाव किती, एवढंच गृहित धरतो. त्यानुसार रक्कम जमवायच्या कामाला लागतो. पण त्यानंतर भरावे लागणारे शुल्क असे प्रकार अनेक असतात, ज्यांचा आपल्या एकूण बजेटवरच परिणाम होतो. कल्पकता महत्त्वाची ================================================================================ प्रतीक पांचाळ on 18 May, 2012 07:15:00 AM पूर्वी कपडे, केशरचना यांच्यापुरतीच मर्यादित असलेल्या फॅशनच्या दुनियेचा प्रभाव गृहसजावटीतही जाणवू लागला आहे. आता गृहसजावट ही गोष्ट केवळ उच्चभ्रू लोकांपुरतीच मर्यादित राहिली नसून ती मध्यमवर्गाच्याही आवाक्यात आली आहे. कमीत कमी जागा, वाजवी पैसा, आकर्षक रंगसंगती आणि जास्तीत जास्त सोयी यासारख्या गृहसजावटीच्या कल्पना सांगणारं हे सदर.. आजीचं ऋण ================================================================================ प्रथमेश पाटील on 11 May, 2012 08:15:00 AM माझ्यासारखी आर्थिक बाजू कमकुवत असलेला माणूस असेल तर त्याला भक्कम आधाराची गरज असते. त्याशिवाय तो घर या शब्दाची कल्पनाही करू शकत नाही. असं असूनही आज माझं बोरिवलीला वन रूम किचनचे घर आहे. ते घेतानाचा मला आलेला अनुभव म्हणजे एक कथाच आहे. मनी-भुभुचं घर ================================================================================ प्रतीक पांचाळ on 11 May, 2012 08:00:00 AM घरात कुत्रा आणि मांजरीसारखे प्राणी पाळणं ही गोष्ट नवीन नाही. पण घरातल्या या पाळीव प्राण्यांसाठी घरातच किंवा घराबाहेर छोटेखानी घर तयार करणं, हा ट्रेंड रुळू लागला आहे. अशी घरं बनवताना प्राण्यांना सोईस्कर पडेल आणि त्यांना राहताना आरामदायी ठरेल, हे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवलं जातं. त्यावरच अशा छोटेखानी घरांची रचना तयार केली जाते. घर विक्रीतील ‘काळा’बाजार ================================================================================ पवन देशपांडे on 11 May, 2012 07:30:00 AM घर खरेदी करताय? तर घराच्या एकूण किमतीच्या 30 टक्के रक्कम तरी रोखीत देण्याची तयारी ठेवा. पहिलं कारण म्हणजे घराच्या किमतीएवढं कर्ज बँक देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सर्व व्यवहार रोखीने न करता धनादेशाद्वारे करण्याचा विचार करत असाल तर काही बिल्डर तुमच्यासोबत व्यवहारच करणार नाहीत. अनेक बिल्डर प्राप्तिकर वाचवण्यासाठी 30 ते 40 टक्के रक्कम रोखीने घेतात. याचा अनुभव घर खरेदी करणाऱ्या प्रत्येकाने घेतला असेल. परवडणारी घरं मिळतील ================================================================================ पवन देशपांडे on 04 May, 2012 07:30:00 AM म्हाडाच्या जाहिरातीनं मुंबईकरांना पुन्हा एकदा स्वस्त घराचं स्वप्न दाखवलं आहे. आता नेहमीप्रमाणे लाखो लोक म्हाडाच्या या स्वस्तातल्या घरासाठी अर्ज काढतील. लॉटरीमध्ये आपलं नशीब आजमावतील आणि नंबर नाहीच लागला तर.. पुन्हा एकदा मुंबईबाहेर दूर उपनगरात कुठेतरी स्वस्तात घर मिळतंय का? याचा शोध सुरू करतील. असा स्वस्त घरांचा शोध मुंबईत येऊन मुंबईकर बनलेला प्रत्येक जण गेली कित्येक वर्ष करतो आहे. पण अद्याप त्यांना ‘परवडणा-या दरातील’ घर मिळालेलंच नाही. जागांच्या किमती इतक्या वाढताहेत की, ‘असावे घरकुल आपुले छान.. पण स्वप्नातच!’ असं म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. मेणबत्त्यांची शोभा ================================================================================ सुवर्णा मयेकर on 04 May, 2012 08:15:00 AM कालपरावापर्यंत घरातले दिवे गेल्यावर उपयोगात येणा-या मेणबत्त्यांचा वापर गृहसजावटीसाठी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. मेणबत्त्यांचा हा वाढता वापर पाहता, सध्या त्या बाजारात विविध आकार आणि प्रकारांत उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अशा आकर्षक मेणबत्त्यांविषयी.. जगण्याचं भान देणारं घरकुल ================================================================================ राधिका गायकवाड on 27 April, 2012 08:05:00 AM घर घेण्याचा प्रवास खूप काही शिकवून जातो. माणसं ओळखण्याची दृष्टी देतो. आयुष्यात व्यवहारीही बनवतो. कधी कधी जगण्याचं नवं भानही देतो.. आणखी वाट पाहू नका! ================================================================================ पवन देशपांडे on 27 April, 2012 07:30:00 AM घर खरेदी करणं हे प्रत्येकाचंच स्वप्न. स्वत:चं घर झाल्यावर असं करू, ही वस्तू घेऊ, येथे हे ठेवू.. अशी अनेक स्वप्नं आपण रंगवलेली असतात. मात्र दुकानात गेलो आणि केली घर खरेदी, अशी एखादी वस्तू विकत घ्यावी एवढी सोपी ही प्रक्रिया नाही. या प्रक्रियेत आपल्याला अनेक कटकटींचा सामना करावा लागतो. तुमचा हा त्रास थोडा कमी व्हावा, यासाठी अनेक प्रकारच्या टिप्स, रिअ‍ॅल्टी मार्केटबद्दल माहिती देणारे ‘गृहमित्र’ हे नवीन सदर..