पहिले पान | मध्यंतर | `मॅड'व्हेंचर

`मॅड'व्हेंचर

महिलादिनी रॅपलिंग

डोंबिवलीच्या ‘सान्निध्य निसर्गमित्र’तर्फे महिलादिनानिमित्त मुंब्रा डोंगरावर खास महिलांसाठी रॅपलिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅपलिंगमध्ये सहभागी झालेल्या दोन महिलांचे अनुभव..
image

बिकट वाट माहुलीगडाची

पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यापैकी माहुली-पळस-भंडार हे तीन किल्ले. सह्याद्रीच्या कुशीत असणारे हे बलशाली किल्ले बघितल्यानंतर महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहासच डोळ्यांसमोर उभा राहतो. चढण्यासाठी अत्यंत अवघड असणारा यातील माहुली हा किल्ला अत्यंत सावधगिरीने सर करावा लागतो. निमुळत्या वाटा, दगडांच्या कपारीतली चढण पार करून २८०० फूट उंचीवरील या किल्ल्यावर पोहोचण्याचा आनंद खरोखरच थरारक असतो. ...
आणखी वाचा
image

अविस्मरणीय सागरी ट्रेक

‘पिनॅकल क्लब’ ही गिर्यारोहण संस्था जंगल ट्रेक, रॅपलिंग नेचर ट्रेक इत्यादींबरोबर गेल्या पाच वर्षापासून कोस्टल ट्रेकही आयोजित करते. यंदा तिने ‘कोस्टल कर्नाटका’ असा ट्रेक आखला होता. कारवार ते मुरुडेश्वर असा मार्ग असलेला हा ट्रेक ट्रेकर्सना नेहमीपेक्षा वेगळा आनंद देणारा ठरला....
आणखी वाचा

सावध ऐका चितळांच्या हाका

आतापर्यंतच्या निरीक्षणात चितळं पाण्यात जात नाहीत, असा समज होता. परंतु कान्हा राष्ट्रीय उद्यानात मे महिन्याच्या दिवसात सांबरांबरोबर एका नाल्यात तीन फूट पाण्यात उभं राहून काही चितळं पाणवनस्पती खाताना आढळली आहेत. ...
आणखी वाचा

सांबराच्या खाणाखुणा

सांबरांची दृष्टी तीक्ष्ण असतेच, परंतु त्यांना ऐकण्याची व वास घेण्याचीही तीव्र शक्ती असते. सांबरांकडे नीट न्याहळून पाहिल्यास आपल्या लक्षात येतं की, त्यांचे कान इतर हरीण वर्गातील प्राण्यांपेक्षा मोठे आहेत. सांबर बहुतेककरून दाट जंगलात आढळतो. तिथे दाट झाडीमुळे त्या परिसरातील दृष्टी क्षेत्र कमी असते, परंतु ऐकण्याचं क्षेत्र खूपच मोठं असतं. ...
आणखी वाचा

शिवसागराच्या पैलतीरावर...

नावाडी मध्येच गावांची नावं सांगत होता. या गावातील घरं किनाऱ्यांवर वसलेली. केवळ हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच. मात्र त्याचं अप्रूप गावकऱ्यांना नाहीच. कोयनेसारखी कोयनाच हे तिच्या प्रवाहातून प्रवास करताना जाणवत होतं. हिरवंगार, स्वच्छ, गोड, थंड आणि भीतीदायक पाणी. हिंदकळणा-या लाटा व त्यावर स्वार झालेले आम्ही. जलाशयात गर्दी नव्हतीच. प्रवासात मोजून दोन बोटींनी आम्हाला दर्शन दिलं होतं. बाकी त्या लाटांवर आमचं साम्राज्य होतं. तापोळ्याच्या शिवसागर तलावातील बोटिंगचा हा अनुभव.. ...
आणखी वाचा
image

अवघड कोरीगड!

निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पेठ शहापूर या गावात उतरलं की रस्त्याच्या डावीकडे कोरीगड किल्ला दिसतो. किल्ल्याचे सुस्थितीत असलेले प्रवेशद्वार आणि तटबंदी बघितल्यावर किल्ल्यावर पोहोचण्याची उत्सुकता वाढू लागते.. लोणावळ्याजवळील फारशा परिचित नसलेल्या एका किल्ल्याची ही ओळख. ...
आणखी वाचा

रात्रीचं जंगल

प्राण्यांच्या चमकणा-या डोळय़ांचे पाहण्याचे अँगल जसजसं बदलतं तसतसं त्यातील रंगांच्या शेड्सदेखील बदलतात, हे निरीक्षकाने लक्षात घेणं जरुरीचं आहे. त्याबरोबर डोळे जमिनीपासून किती अंतरावर चमकताना दिसतात, दोन डोळय़ांतील अंतर व रंग हे पाहूनच प्राणी कोणता असेल, याचा अंदाज लावावा....
आणखी वाचा
image

एव्हरेस्ट थरारक दृश्यानुभव

वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातील सायन्स ओडिसीमध्ये नुकतीच ‘एव्हरेस्ट’ ही डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. एव्हरेस्टवर प्रथमच चढाई करणारे सर एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांची शौर्यगाथा असलेली ही डॉक्युमेंट्री पाहणं हाही एक चित्तथरारक अनुभव होतो. एव्हरेस्ट सर करणारी मराठीकन्या कृष्णा पाटील हिनेदेखील ही डॉक्युमेंट्री पाहिली....
आणखी वाचा
image

जंगलातले इशारे

आपल्या हद्दीत कुणी अपरिचित आल्यास किंवा धोका वाटल्यास जंगलातले प्राणी लगेच इशारे देतात. या इशा-यांवरूनच प्राण्यांच्या वर्तनाचा अर्थ काढता येतो. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 next total: 76 | displaying: 1 - 10