PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: वैचारिक भारतीय प्रसारमाध्यमातील अदृश्य घटक ================================================================================ रॉबिन जेफ्री on 20 May, 2012 01:45:00 PM सन 1991 मध्ये तिथं कुणी नव्हतं, आजही तिथं कुणी नाही- प्रसारमाध्यमांमधील दलितांबद्दल मी बोलतो आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकसंख्या असलेल्या दलितांचं (अनुसूचित जाती आणि जमाती) काय चालू आहे हे कुणाला माहीत असायचं काही कारणच नाही, कारण त्याबद्दल कधीही लिहिलं जात नाही, कधीही दाखवलं जात नाही... शिक्षण वाचवा राजकारणापासून ================================================================================ सुहास पळशीकर on 20 May, 2012 12:50:00 PM राजकारणाबाबत तरुण पिढीने गंभीरतेने आणि सर्तकतेने विचार करावा यासाठी आम्ही हे पुस्तक बनवले होते. मात्र, आपले राजकारणी त्यासाठी अजून तयार झाल्याचे दिसत नाही. विनाशाच्या काठावरील शेजारी ================================================================================ गोविंद तळवलकर on 13 May, 2012 12:00:00 PM पाकिस्तानी लष्कराचे हे धोरण प्रथमपासून होते. पण बुश व त्यांचे अधिकारी यांनी दखल घेतली नाही. ओबामा अध्यक्ष झाल्यावर त्यांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी पाकिस्तानला गोंजारण्याचे धोरण सोडून दिले. मुशर्रफ यांना बुश यांच्या काळात खास स्थान होते ते संपले. तसेच कारझाई यांचा भ्रष्ट कारभार आणि दुटप्पी धोरण यामुळे त्यांच्याशी ओबामा स्पष्टपणे बोलून आपले काय मत आहे ते सांगू लागले. आजचं नाटक ================================================================================ मनस्विनी लता रवींद्र on 13 May, 2012 11:54:00 AM आजचा काळ हा गोंधळाचा आहे. निराशेचा आहे, मानसिक अस्थैर्याचा आहे. पण जसं दुस-या महायुद्धानंतर अ‍ॅबसर्ड नाटकांचा काळ झाला, अस्तित्ववादी साहित्याचा उगम झाला. आता मी अ‍ॅबसर्ड नाटक लिहिणार असं कोणी ठरवून ते साहित्य लिहिलं नाही. ते परिस्थितीजन्य होतं. काहीच बदल होत नाहीये, काही घडत नाहीये, कुठलीच आशा नाहीये या सरसकट भावनेतून अनेक जण लिहू लागले, व्यक्त होऊ लागले. कलेच्या माध्यमातून. आणि मग त्याला अ‍ॅबसर्ड किंवा एक्झिर्स्टेशिअ‍ॅलिझमच्या व्याख्येत बसवलं गेलं. आजचा काळ हा घडण्याचा आहे. सातत्याने, रोज नवीन काहीतरी घडतंय. अशा वेळेस आपला फॉर्म काय असेल? आहे? विनाशाच्या काठावरील शेजारी ================================================================================ गोविंद तळवलकर on 29 April, 2012 12:30:00 PM आपल्यापुढील प्रश्न हाताळण्याचे उपाय पाकिस्तानी नेत्यांनी त्वरित योजले नाहीत तर एक विनाश पावणारे राष्ट्र म्हणून पाकिस्तान लवकरच ओळखले जाईल. आज पाकिस्तानची लोकसंख्या आहे साडेअठरा कोटी. ती 2050 साली 27.5 कोटी होईल. आजच लोकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार हातभार लावू शकत नाही. मग नंतर काय होईल? इति जनुकाख्यानम् ================================================================================ डॉ. उज्ज्वला दळवी on 22 April, 2012 12:20:00 PM उत्तुंग विंध्य पर्वताला नमवणा-या आणि अथांग समुद्राला पिऊन टाकणा-या अगस्त्य मुनींच्या जन्माची गोष्ट देवीभागवतात सांगितली आहे आणि त्यांच्या विवाहाच्या कथेचा उल्लेख महाभारतात आहे. मार्क्‍स आणि देवपुत्र ================================================================================ विनोद शिरसाठ on 22 April, 2012 11:33:00 AM अकरावी-बारावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मार्क्‍स व एंगल्स यांचे धडे वगळण्याची शिफारस प. बंगालमध्ये करण्यात आली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. ‘हा प्रकार म्हणजे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न आहे’, अशी प्रतिक्रिया कम्युनिस्ट पक्षांतून येत आहे तर ‘हा प्रकार म्हणजे इतिहासाच्या लेखनात समतोल साधण्याचा प्रयत्न आहे’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांच्या गोटातून दिली जात आहे. कम्युनिस्टांनी सलग 34 वर्षाच्या राजवटीत प. बंगालमधील माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मार्क्‍स, लेनिन व बोल्शेविक क्रांती यांचे नको तितके अवडंबर माजवले आहे; असे त्यांचे स्पष्ट मत आहे. कर्क-वृत्त ================================================================================ डॉ. उज्ज्वला दळवी on 08 April, 2012 11:55:00 AM सध्या कर्करोगावर जे अत्याधुनिक इलाज केले जातात, त्यांच्यात कर्कपेशींमधल्या विकृत प्रथिनांचाच वेध घेतला जातो. या संदेश-प्रथिनांवरचा नेमका उतारा बनवायला मानवी कर्कग्रंथींशी इतर प्राण्यांच्या पेशींचा संकर करून तयार होणार hybridoma वापरले जातात. काट्यानं काटा काढायची ही अभिनव जीवशास्त्रीय पद्धत म्हणा ना! .. कर्करोगावरील विस्तृत लेखाचा संपादित भाग. म्यानमार संविधान आणि राज्यव्यवस्था यांचा प्रदीर्घ घोळ ================================================================================ लिपी घोष on 08 April, 2012 10:55:00 AM दक्षिणपूर्व आशियातील देशांच्या तुलनेत म्यानमारमधे किती तरी जास्त विभिन्न प्रकारचे वांशिक गट आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जगात कुठेही झाले नसतील एवढे झगडे वांशिकतेच्या चौकटीमधून झालेले आहेत. वांशिक-भाषिकतेच्या तत्त्वावरून केलेल्या वर्गीकरणानुसार म्यानमारमधे परस्परांपासून अगदी वेगळे असलेले असे 135 भाषिक-सांस्कृतिक गट आहेत.. म्यानमरमधील लोकशाहीच्या तिढ्याची कारणं सांगणा-या लेखाचा पहिला भाग. फक्त चिंगळ्याच पकडणारे मराठी 'नेट'! ================================================================================ रवींद्र देसाई on 01 April, 2012 11:55:00 AM नवी ब्लॉग संस्कृती मराठी भाषेच्या समृद्धीकरणाचे शिवधनुष्य लीलया पेलू शकेल. यासाठी गरज आहे ती अधिकाअधिक लोकांनी आपापल्या क्षेत्रातील सा-या छोट्यामोठ्या बाबींबाबत आंतरजालावर लिहिण्याची! पण नाइलाजाने इतकेच म्हणावेसे वाटते की, ‘नेट’ लावून वाचावे, असे लिखाण मराठी संकेतस्थळांवर सध्या तरी उपलब्ध नाही. पण आपापले ब्लॉग्ज संपादकीय संस्कार करवून मगच प्रसिद्ध करायचे बंधन जर सर्वानी कसोशीने पाळले, तर मराठी संकेत-स्थळे आणि पर्यायाने मराठी भाषाही नक्कीच ऊर्जितावस्थेला येईल.