वैचारिक

मानवप्रकृतीच्या पुनर्मूल्यांकनाचे युग

20 February, 2011 04:30:00 AM
भारतीय पुनर्जाग्रणाच्या काळात, तसेच स्वाधीनतेच्या भावनेनं ज्या सांस्कृतिक शक्तींचा देशाच्या मनात संचार झाला, त्या अरुणोदयाच्या उन्मेषाने मुख्यत: भारतीय भाषांमधील साहित्याचं मन या युगात प्रेरित झालं. आजच्या राजनीतिक- आर्थिक संघर्षाच्या मध्ये तसेच मागील युगातील विभिन्न मनांमध्ये एका नव्या भारताची रूपरेषा साहित्याच्या धरतीवर उगवून येते आहे. एका नवीन राष्ट्रीय तसेच मानवीय एकतेचा अनुभव हळूहळू प्रबुद्ध वर्गाला येऊ लागला आहे. एकीकडे त्यात परंपरागत मूल्यं, नैतिक दृष्टिकोन आणि जातीपातीच्या बंधनात अडकलेल्या वर्गाचा -हास होतोय. त्यामुळे जनसामान्य अत्याधिक चरित्रहीन तसेच शीलभ्रष्ट झाला आहे.

मराठी, माध्यम आणि महाराष्ट्र

13 February, 2011 10:15:00 AM 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. तो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘अंतर्नाद’चा फेब्रुवारीचा संपूर्ण अंक ‘मराठी भाषाविषयक’ आहे. त्यातील हा एक लेख संपादित स्वरूपात. मराठी माध्यमाबाबतच्या काही गैरसमजांचा परामर्श घेणारा.. ...
आणखी वाचा

त्याची शिकवणी अजूनही चालू असते

13 February, 2011 09:45:00 AM युद्धखोर लोकं बदलणार नाहीत पण आपल्याला लढलं पाहिजे. निदान एक शांततामय वातावरण तयार करण्यासाठी. आणि त्यासाठी छायाचित्राद्वारे एक भाष्य करण्याचा प्रयत्न मी सतत केला. मला खरं तर निसर्गाचं छायाचित्रण करायचं आहे पण त्यासाठी एक नजर तयार व्हावी लागते. मी जे आता करतोय की कुणीतरी उपाशी आहे किंवा मरून पडलाय, तर हा फोटो काढण्यास कुठल्याही शिक्षणाची गरज नाही, पण काहीतरी कलात्मक काढायचे आहे तर त्यासाठी ब-यापैकी अभ्यास लागतो. युद्ध माझ्या डोक्यातून जात नाही आणि प्रतिमा अजूनही माझा पाठलाग करतात. ...
आणखी वाचा

पहिल्या फिल्म प्रबंधाचा लेखक

30 January, 2011 10:44:00 AM चित्रपटासंबंधीच्या सौंदर्यशास्त्राचे बुद्धीगम्य विश्लेषण करणारा कुलशेव्ह हा जगातला पहिला विचारवंत. कुलशेव्हच्या 50 वर्षाच्या कारकीर्दीत केवळ रशियन सिनेमाचा विकास झाला असे नाही तर जगभरच्या सिनेमाला दिशा मिळाली. कुलशेव्हचे सिनेमा कलेला खूपच मोठे योगदान आहे. जगातली पहिली फिल्म इनिस्टय़ुट त्याने मॉस्कोत स्थापन केली. तो एक प्रभावी फिल्म पंतोजी तर होताच पण त्याचबरोबर क्रमांक एकचा प्रभावी चित्रपट दिग्दर्शकही होता....
आणखी वाचा

माझ्याकडच्या जमेच्या पावत्या

30 January, 2011 10:39:00 AM साधारणपणे आठ गावांमधून पाऊण महिना आम्ही फिरलो. 350 च्या आसपास मुले या शिबिरांतून सहभागी झाली. सत्रे घेताना आम्हालाच इतके शिकायला मिळाले, की त्याचाच आनंद प्रचंड होता. काही दिवसांनी आम्हाला पुण्यात एक पत्र मिळाले. एका गावातल्या मुलीचे ते पत्र आमचा उत्साह वाढवणारे होतेच; पण त्या मुलीचा धीटपणा, तळमळ आणि कार्यक्रमाची उपयुक्तताही अधोरेखित करणारे होते. ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे, पण अधूनमधून ते वाचल्याने मनाला जी उभारी मिळते ती जास्त मोलाची आहे...
आणखी वाचा

लोकशाहीला काळिमा फासणारी जन्मठेप

30 January, 2011 10:34:00 AM छत्तीसगड या नवनिर्मित राज्यातील रायपूर जिल्हा न्यायालयाने 24 डिसेंबर 2010 रोजी देशद्रोही कारवाया करणा-यांना मदत केल्याचा आरोप ठेवून डॉ. सेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेबाबत माहिती मिळताच अनेक जण व्यथित झाले. देशभरच नाही तर जगातील कानाकोप-यांतून निषेधाचे सूर उमटायला लागले आहेत. मानवी हक्क चळवळीचे कार्यकर्ते म्हणूनही ओळख असलेले डॉ. सेन ‘लोक स्वतंत्रता संघटना’ (पीयुसीएल) या देशपातळीवरील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत....
आणखी वाचा

नॉट ओन्ली सारा शगुफ्ता..!

23 January, 2011 05:15:00 AM ‘इज्जत’ या शब्दाने तिला जन्मभर हुलकावणी दिली. एका इज्जतदार अमीराशी तिचं चौथं लग्न करून दिलं गेलं. तेव्हादेखील ‘इज्जत’ तिच्यापासून दूरच राहिली. औषधपाण्याचे अत्यावश्यक मानवी हक्कदेखील तिला नाकारण्यात आले. लिहा-वाचायला मनाई केली गेली, तेव्हा ती पुन्हा एकदा आत्मसन्मानासाठी घराबाहेर पडली. तिला प्रेम हवं होतं, आधार हवा होता, जो तिला सापडला भारतातल्या एका मैत्रिणीच्या रूपात! ही मैत्रीण होती, अमृता प्रीतम!...
आणखी वाचा

सायबर विश्व साधन मुक्तीचे की नियंत्रणाचे?

23 January, 2011 07:50:00 AM तरुण ‘डिजिटल नेटिव्हज’च्या लेखी आर्थिक समृद्धी महत्त्वाची असल्याने व ‘सायबर विश्वा’तील गुन्हेगारी स्वरूपाच्या कामकाजाच्या मोबदल्यात धनलाभ होत असल्याने ते याकडे वळतात. त्यातच देशात आर्थिक विषमता मोठय़ा प्रमाणावर असेल आणि देशातील अकार्यक्षम राजकीय व्यवस्थेबाबत या तरुणांच्या मनात राग असेल तर हे प्रकरण अधिकच गंभीर होत जाते. कारण, स्वत:ची आर्थिक प्रगती साधतानाच राजकीय व्यवस्थेसमोर अडचणींचा डोंगर उभा करणे हे त्यांच्या दृष्टीने आव्हानाचे काम ठरते. ...
आणखी वाचा

गौप्यापेक्षा स्फोटच मोठा

09 January, 2011 11:19:00 AM असान्ज हा अराजकवादी असून सध्याची व्यवस्था त्याला नष्ट करायची आहे. त्याच्या आईने त्याला परंपरागत शिक्षण दिले नाही. अशा शिक्षणामुळे मुले परंपरागत विचार करतात व त्यांची स्वतंत्र वृत्ती संपुष्टात येते, असे तिचे मत असल्यामुळे असान्जला नेहमीचे शिक्षण मिळाले नाही. तो ज्या ब्रिटिश पत्रकाराच्या निवासस्थानात राहत आहे, ते त्याचे वडिलोपार्जित आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था उखडण्याची क्रांती या प्रासादातून होणार असावी. ती केव्हा व्हायची ती होवो, पण आतापर्यंत प्रसिद्ध झालेली अमेरिकन परराष्ट्र खात्याची गुप्त कागदपत्रे वाचली तर त्यात गौप्य कमी आणि त्याचा स्फोट वा स्फोटाचा आवाज मोठा, असे म्हटले पाहिजे....
आणखी वाचा

माहितीचा अधिकार कायदा सद्य:स्थिती व आव्हाने

09 January, 2011 11:27:00 AM स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतात ब्रिटिश राजवट ही कायद्याचे राज्य, चाकोरीबद्ध नोकरशाही व स्वतंत्र न्यायपालिका यांच्या माध्यमातून कार्यरत होती. याचा वारसा भारतीय प्रशासनाला मिळाला आणि प्रजासत्ताक राजवट आली तरी आजही सत्ता व प्रशासन हे ब्रिटिश शासनाप्रमाणे जनतेपासून दूरच राहिले. परिणामी भारतामध्ये लोकशाहीचा तत्त्व म्हणून स्वीकार करण्यात आला असला तरी व्यवहारात मात्र या तत्त्वाचा अंमल दिसून येत नाही. राजकीय स्वातंत्र्य व लोकशाही प्रस्थापित झाली तरी माहितीचे स्वातंत्र्य व माहितीची लोकशाही प्रस्थापित होऊ शकली नाही....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 next total: 165 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड