वैचारिक

लोकपाल विधेयक वास्तव व समस्या

29 May, 2011 12:06:00 PM
लोकपाल संस्थेला स्वत:हून चौकशी करण्याचा अधिकार सरकारी विधेयकात नाही. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सभापतींनी तशा प्रकारची तक्रार केल्यानंतरच हा अधिकार लोकपाल वापरू शकतील. याउलट जन लोकपाल विधेयकामध्ये लोकपाल कुणाच्याही तक्रारीच्या आधारे चौकशी करू शकेल व त्यासाठी कुणाच्याही मान्यतेची गरज असणार नाही, अशी तरतूद केलेली आहे. अशा प्रकारची तरतूद एका अर्थाने पूर्वनियोजित पद्धतीने एखाद्याला लक्ष्य करून ठेचून मारण्याची व्यवस्था करू शकते. याबाबतीत सरकारी विधेयकाला जी तरतूद आहे, ती अधिक शहाणपणाची आहे.तक्रारीसाठी तक्रार करण्याला वित्तीय दंड बसवण्याची फक्त तरतूद आहे.

नव्या समाजवादी पक्षाची स्थापना

22 May, 2011 03:30:00 AM ज्येष्ठ नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व हेवेदावे यांमुळे जनता पक्षाची फाटाफूट 1979 साली सुरू झाली. पूर्वीच्या जनसंघानेही भारतीय जनता पार्टी या नावाने आपले कार्य स्वतंत्रपणे सुरू केले. चरणसिंग यांचा लोकदल वेगळा झालाच होता. सोशलिस्ट मंडळी मात्र जनता पक्षात राहिली. अनेक जुने काँग्रेस कार्यकर्तेही राहिले. आपण या पक्षामार्फतच सोशलिस्ट धोरणे व कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू, कारण 1977च्या लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता त्याचा तोंडवळा खूपसा समाजवादी होता. आपण पक्षफोडे आहोत अशी आपली बदनामी झालेली आहे. आता जनता पक्ष (पुढे ‘दल’) फोडण्याचे काम तरी आपण करू नये असे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते. पण पक्षात सामील झालेल्या अनेक संधिसाधू मंडळींनी ध्येयधोरणाबद्दल वाद न घालता पक्षातील महत्त्वाची पदे व त्या आधारे शक्य ती सत्तापदे मिळवण्याच्या कारवाया चालवल्या होत्या. परिणामत: सगळे समाजवादी एकत्र राहिले नाहीत. काही जण सत्तेसाठी वेडय़ावाकडय़ा तडजोडी करू लागले. मात्र अनेक निष्ठावंत कार्यकत्रे पक्षात निष्क्रिय झाले. 90नंतर जनता दलातील काही समाजवादी नेत्यांनी बाहेर पडून स्वत:चे लहान लहान पक्ष स्थापन केले. मुलायम सिंह, लालूप्रसाद यादव, मुलायम सिंह, जॉर्ज फर्नाडिस, शरद यादव व रामविलास पासवान यांनी आपापले वेगळे पक्ष काढले....
आणखी वाचा

स्त्री प्रश्नांची प्रतिगामी वाटचाल?

22 May, 2011 03:30:00 AM प्रामाणिकपणे सांगायचे तर, स्त्रीवाद किंवा स्त्रीचळवळ ह्यांच्या स्वरूपामध्ये जसा बदल होतो आहे, तसाच बदल राज्यसंस्थेच्या स्वरूपामध्येही होतो आहे. पूर्वीही कधी फक्त स्त्रीचळवळीचा धाक असे कधी होते असे वाटत नाही. परंतु ताराबाई िशदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आणि मुक्ता साळवे ह्यांची बाजू घेण्यासाठी महात्मा फुले ह्यांना आपली लेखणी परजावी लागली होती. न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी ह्यांच्यापासून थेट आगरकरांपर्यंत स्त्रीसुधारणेच्या चौकटीचा गांभीर्याने विचार झाला होता. ...
आणखी वाचा

महाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी

15 May, 2011 08:00:00 AM महाराष्ट्राची ही ओजस्विता नंतर फारशी दिसलीच नाही. संयुक्त महाराष्ट्रातील आम जनता शासनाच्या खिरापती आणि अनुदाने यांची मिंधी बनून गेली; अगदी लेखक, साहित्यिक, नाटककार, कवी, शाहीर या सगळ्यांची प्रतिभाच आटली. आता सर्व मराठी माणसांची ‘हे असेच चालायचे, आपण काहीच करू शकणार नाही’ अशी भेकड आणि मिंधी प्रवृत्ती तयार झाली आहे. मोरारजी देसाईंनी आंदोलनाला ऊर्जा पुरवली, यशवंतराव चव्हाणांनी सगळ्या महाराष्ट्राचे पौरुष घालवून महाराष्ट्राला न झेपणारा लाचार व्यवहारवाद लोकांच्या गळी उतरवला. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन धडधडत असताना आणि महाराष्ट्रात जागोजागी तुडुंब भरलेल्या सभा होत असताना शाहिरांच्या तोंडी संयुक्त महाराष्ट्र म्हणजे ‘मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. एका अर्थाने हुतात्म्यांच्या स्वप्नांतील संयुक्त महाराष्ट्र कधी उभा राहिलाच नाही....
आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राजकीय अर्थव्यवस्थात्मक मूल्यमापनाची चौकट

08 May, 2011 10:30:00 AM एक मे रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षाच्या वाटचालीचे मूल्यमापन विविध प्रकारे करता येईल. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी ज्या समतोल आणि लोकाभिमुख विकासाचे स्वप्न रंगविले गेले, त्याच्या तुलनेत आज महाराष्ट्र कोठे आहे, हे पाहून मूल्यमापन करता येईल किंवा इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना करता येईल. (मात्र मुंबई-पुणे पट्टा वगळला तर महाराष्ट्र इतर मागास राज्यांच्या रांगेतच बसेल अशीच शक्यता जास्त आहे.)...
आणखी वाचा

ओसामा, ओबामा आणि आपण..!

08 May, 2011 10:15:00 AM ओसामाचा १० वर्षे माग काढून अमेरिकेनं त्याला ठार मारलं आणि 9/11 च्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळवून दिल्याचं जाहीर केलं..आणि अमेरिकेत जल्लोष झाला. जगभरात समाधान व संभ्रम अशी द्विधा अवस्था निर्माण झाली. ...
आणखी वाचा

जागतिकीकरणाचा दुचका..

24 April, 2011 01:15:00 PM गेल्या दशकात निर्माण झालेल्या कसदार साहित्याकडे पाहिल्यास असे दिसून येते की साहित्यनिर्मितीची केंद्रे आता खेडय़ाकडे सरकली आहेत. चोखंदळ रसिक, वाचक, समीक्षकांनी त्याचा स्वीकारही केलेला आहे. अर्थात साहित्यात घडून येणारे, आलेले परिवर्तन हे काही स्वतंत्रपणे, सुटेपणाने घडून आलेले नाही. ...
आणखी वाचा

अरब जगतातील जस्मीन आणि लोटस क्रांती

24 April, 2011 12:00:00 PM डिसेंबर 2010 मध्ये अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स येथे काही अरब राष्ट्रप्रमुख एका अनोख्या ठरावाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र आले होते. बरोबर पन्नास वर्षापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने एक ठराव केला होता. या ऐतिहासिक ठरावाचा क्रमांक होता 1514 आणि या ठरावाचा आशय होता, की जगातील सर्व वसाहतींना स्वयंनिर्णयाचा हक्क आहे. याचाच अर्थ असा, की प्रत्येक समाजाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. या ठरावामुळे जगभर सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळींना नैतिक अधिष्ठान मिळाले. हा ठराव 14 डिसेंबर 1960 रोजी पारित झाला होता...
आणखी वाचा

गांधींनंतरचे गांधी

17 April, 2011 10:30:00 AM मी गांधीवादी नाही. माझे मत दखलपात्र नसेलही, पण माझ्या समजानुसार गांधींपेक्षा गांधीवाद श्रेष्ठ आहे. गांधी त्यांचे तत्त्वज्ञान पूर्णपणे आचरणात आणू शकले नाहीत; कारण ते व्यवहारकुशल राजकारणी होते, आणि वैचारिक व नैतिक शुद्धता पातळ करणे हे राजकारणाचे कामच आहे. अर्नोल्ड टॉयन्बीने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत असे म्हटले आहे की, राजकारणाच्या घाणेरडय़ा वस्तीत राहायला तयार असणारा तो एक देवदूत होता. त्यामुळे शंभर टक्के गांधीवादी होणे खुद्द गांधींना परवडण्याजोगे नव्हते. त्यांना ‘अपूर्ण गांधीवादी’ म्हणणे म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करणेच होय. सध्या भारतात चार प्रकारचे गांधी आहेत. पहिले गांधी हा भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यावादाचे गांधी आहेत. दुसरे गांधी हे गांधीवाद्यांचे गांधी आहेत. आजचे तिसरे गांधी हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आहेत. चौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत. ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्षपणे. ...
आणखी वाचा

वित्तीय मूलतत्त्ववाद!

03 April, 2011 12:25:00 PM केंद्र सरकारने 2011 चा अर्थसंकल्प सादर करून आता जवळपास एक महिना होत आहे. त्यामुळे आता त्याचे साकल्याने आणि पुरेशा तटस्थपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’च्या संपादकांनी या लेखात केला आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 165 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड