पहिले पान | मध्यंतर | स्त्रीविधा

स्त्रीविधा

तोच खरा सुदिन!

‘जागतिक महिलादिन’ नुकताच पार पडला. या निमित्ताने समाजातील वेगवेगळ्या थरातील महिलांकडे पाहिलं तर काय लक्षात येतं? मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सधन आणि सामाजिक उतरंडीच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या महिला यांच्यात प्रचंड दरी जाणवते. ही दरी बुजेल तो महिलांसाठी खरा सुदिन असेल.

सायकलींनी कोंडी फोडली

गावात सातवीपर्यंत शाळा. पुढं शिकायचं तर तालुक्याचं गाव सात किलोमीटर. रिक्षा होत्या, पण मुलींना अशा जोखमीच्या स्थितीत शाळेत पाठवायला पालक तयार नव्हते. मुलींना होस्टेलला ठेवायचीही पालकांची तयारी नव्हती. अर्चनाताई मुलींशी, त्यांच्या पालकांशी बोलल्या....
आणखी वाचा
image

धनाची पेटी

घरात एक छानसं, छोटंसं बाळ आलंय, त्याला नीट वाढवायचंय, जे काही त्याच्यासाठी करण्यासारखं आहे, ते करायचं. त्याला एक चांगला माणूस बनण्यासाठी जे जे काही देऊ शकतो, ते द्यायचं. त्याच्या बाळलीला पाहण्यात-अनुभवण्यात आणि त्याच्याबरोबर आई-बाप म्हणून स्वत:ही मोठं होण्यात सगळं वसूल. मग, तो मुलगा की मुलगी, हे फजूल. यापुढे मुलीच्या आई-बापांचं ‘धनाची पेटी’ असं सांत्वनयुक्त अभिनंदन करण्याआधी दहादा विचार करा.. तुमच्या मनातही नसेल तसं.. पण, तुम्ही त्यांचा घोर अपमानच करीत असता. ...
आणखी वाचा

आडनावाचं उसनं लोढणं

तिचं नाव ही तिची ओळख आहे. लग्न झालं काय आणि मोडलं काय; त्यामुळे तिच्या या ओळखीत काहीही फरक पडणार नाही. मग हवंय कशाला नव-याच्या नावाचं उसनं लोढणं?...
आणखी वाचा
image

न सुटणारे प्रश्न नव्याने विचारू या का स्वत:ला?

महिलादिन आपला म्हणून आग्रहाने साजरा करता करता सगळेच दिवस खरं तर आपल्यालाच हवेत, या विचाराशी पोहोचावं, या दिशेने प्रवास होईल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात तो आणखी एक हळदीकुंकू दिवस बनून राहिला याचं भानच उरलेलं नाही, या वास्तवाचं काय करायचं? आणि हे सगळं एरवीही सतत वाटत असताना ते मांडण्यासाठी मात्र पुन्हा महिलादिन उजाडायची वाट पाहिली जावी, हेही कशाचं प्रतीक म्हणायचं?...
आणखी वाचा
image

आई नसलेल्या मुलीची गोष्ट

आपण ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे आईची थोरवी गाणारे सुविचार आपण ऐकत-ऐकवत असतो. ते बाजुला ठेवू या, पण एका लहानग्या बाळासाठी आई हवीच. ब्रॅड आणि मायकलला आपल्या संसारासाठी पत्नीची गरज लागली नाही तरी अ‍ॅश्टनला तिच्या आयुष्यात आईची गरज लागणारच. ब्रॅट किंवा मायकलला तिच्या आईची जागा कशी घेता येईल?...
आणखी वाचा
image

भावनांचं संमोहन

हे कोणतंही हिप्नोटिझम नाही. हायपोथेरपी, थेटा हिलिंग, योगा, आदी माध्यमातून संबंधितांच्या समस्या सोडवणं आहे. जीवनात यशस्वी ठरण्यासाठीचे गुण तुमच्याच अंतरंगात असतात. ते तुमच्यासमोर येणं हेच कठीण काम आहे.’ प्रत्येक माणूस स्वत:चाच विचार करत असतो. इतरांच्या वागण्या-बोलण्याचा स्वत: त्रास करून घेतो. महिलांच्या बाबतीत तर हे अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. ...
आणखी वाचा
image

नक्षलवाद्यांविरुद्ध लढणारी रणरागिणी

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांविरुद्ध लढणा-या कमला आलमचा नुकताच दूरदर्शनचा ‘सह्याद्री हिरकणी’ पुरस्कार देऊन मुंबईत गौरव करण्यात आला. केवळ आपल्या हिमतीच्या बळावर नक्षलवाद्यांविरोधात लढणा-या कमला यांच्या बहादुरीची कहाणी खरोखरंच कौतुकास्पद आहे....
आणखी वाचा

स्वातंत्र्य हवं की नको?

...अखेर तिनं नोकरी स्वीकारली. सासू-सासरे, नणंद, दीर अशा कुटुंबात ती रमू लागली. पण काही महिन्यांनंतर तिला वेगळा अनुभव येऊ लागला. सगळे जण तिच्यावर ‘वॉच’ ठेवून होते. खासकरून ऑफिसमधून उशीर झाल्यावर तिला टोमणे मिळायचे. परंतु ती कुणालाच जुमानत नसे. हळूहळू ही बाब शशांकच्या निदर्शनास आली. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण अमृता ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती....
आणखी वाचा
image

बाई मी धरण बांधते..

धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन केलं जातं. पण अशावेळी बहिणींच्या समान वारसा हक्काचा विचार केला जात नव्हता. ‘श्रमिक मुक्ती दला’ने अलीकडेच केलेल्या आंदोलनानंतर मूळ खातेदारांच्या मुलींनासुद्धा स्वतंत्र खातेदार म्हणून जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता भावांबरोबर बहिणींनाही मालमत्तेत समान हक्क मिळणार आहे....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 115 | displaying: 1 - 10