PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विश्वकारण लिबियातील आंदोलन निर्णायक टप्प्यावर ================================================================================ सायली परांजपे on 26 February, 2011 03:30:00 AM अनेक वर्षापासून अमर्याद सत्ता उपभोगणा-या राज्यकर्त्यांची उचलबांगडी करण्यासाठी जनतेने एकत्र येऊन बंड पुकारणे हा ‘पॅटर्न’ तिन्ही राष्ट्रांमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये दिसत असला तरी प्रत्येक राष्ट्रामध्ये आंदोलनाला कारणीभूत ठरलेली परिस्थिती बघणे क्रमप्राप्त आहे. सुदानच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू ================================================================================ मधुबन पिंगळे on 18 February, 2011 02:50:00 AM दक्षिणेतील बंडखोर आणि सुदानी लष्करा यांच्यातील यादवी थांबवण्याचे संकेत २००३नंतर मिळू लागले. दोन्ही बाजूंमध्ये 2005 मध्ये शांतता करार झाला. दक्षिण भागाला सहा वर्षासाठी स्वायत्तता देणार आणि या काळात सार्वमत घेऊन त्यातील निर्णय दोन्ही बाजूंनी मान्य करण्यावर सहमती झाली. त्यानुसारच गेल्या महिन्यात सार्वमत घेण्यात आले. इस्लामी कट्टरवादापुढे पाकिस्तान सरकार नमले ================================================================================ सचिन दिवाण on 12 February, 2011 02:35:00 AM पाकिस्तानमधील लाहोर शहरात काही दिवसांपूर्वी 40 हजार धार्मिक कट्टरवाद्यांनी ईश्वरनिंदा कायद्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित सुधारणांविरोधात निदर्शने केली. धार्मिक पुनरुज्जीवनाचे द्योतक असलेल्या या घडामोडी समाजाला मागे नेणा-याच आहेत. सावध पवित्रा, मर्यादित फलनिष्पत्ती ================================================================================ सचिन दिवाण on 29 January, 2011 04:30:00 AM चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताव यांनी गेल्या आठवडय़ात (18 ते 21 जानेवारी) अमेरिकेला भेट दिली. गेल्या 13 वर्षातील त्यांची ही पहिलीच अमेरिकाभेट होती. चिनी माध्यमांनी या भेटीचा ऐतिहासिक आणि यशस्वी दौरा म्हणून गवगवा केला असला तरी प्रत्यक्षात या भेटीतून दोन्ही देशांच्या संबंधांत मूलभूत किंवा क्रांतिकारक बदल झालेले नाहीत. ट्युनिशियापुढे सत्तांतरानंतर अपेक्षापूर्तीचे आव्हान ================================================================================ सचिन दिवाण on 22 January, 2011 03:30:00 AM 2008 साली आलेल्या जागतिक मंदीने परिस्थिती अधिक बिकट बनली. रोजगाराचा प्रश्न उग्र बनला. मोहम्मद ब्वाझिझी हा महाविद्यालयीन शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेला तरुण 17 डिसेंबर 2010 रोजी नाईलाजाने सिदी बौझिद येथील रस्त्यावर भाजीपाला विकण्यासाठी उतरला. पोलिसांनी त्यालाही मज्जाव केला. अखेर त्याने आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला. साधारण एक कोटीहून काहीशी जास्त लोकसंख्या असलेला टय़ुनिशिया या घटनेने खवळून उठला. लोक रस्त्यावर उतरले. देशाच्या अंतर्गत भागात सुरू झालेली हिंसक निदर्शने 13 जानेवारीला राजधानी टय़ुनिसपर्यंत पोहोचली होती. ‘ नेपाळची वाटचाल अस्थिरतेकडे ================================================================================ रेश्मा भुजबळ on 15 January, 2011 04:30:00 AM माओवाद्यांची सदस्य संख्या अधिक असूनही इतर मोठे पक्ष त्यांच्याबरोबर जाण्यास उत्सुक नाहीत. तर माओवाद्यांनी त्यांचे समांतर लष्कर आणि निमलष्करी संघटना कायम ठेवल्या असल्याने तसेच या संघटना कायमच्या बंद करण्यासाठी माओवादी कोणताच प्रयत्न करत नसल्याने लहान पक्ष त्यांच्याबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत. तसेच प्रचंड यांच्याबरोबर अन्य प्रमुख माओवादी नेता बाबूराम भट्टराई, मोहन वैद्य यांच्यातच मतभेद असल्याने तेही एकत्रित काम करणे अवघड आहे. नव्या दशकाच्या उंबरठ्यावरील जग ================================================================================ सुजय शास्त्री on 08 January, 2011 04:30:00 AM या दशकात तंत्रज्ञानाची मानवी जीवनावर वाढणारी पकड आणि मलेरियासारख्या रोगाविरुद्ध चाललेली आंतरराष्ट्रीय लढाई हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रस्फोटामुळे जग जवळ आले असे आपण म्हणत असताना माणूस माणसापासून दुरावला गेल्याचीही खंत सर्वत्र व्यक्त केली जात होती. पण तंत्रज्ञानाने ही भीतीही व्यर्थ ठरवली. प्राधान्य शांततेलाच... ================================================================================ सचिन दिवाण on 27 December, 2010 05:30:00 AM ताज्या घडामोडींमुळे दक्षिण व उत्तर कोरियात युद्ध भडकेल, असे वरकरणी वाटत असले तरीही दोन्ही देशांतील तणावाचा इतिहास पाहता परिस्थिती पराकोटीला जाईल, असे तूर्तास वाटत नाही. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या पूर्वीही बरेचदा कुरापती काढल्या आहेत. त्याही वेळी युद्धज्वर वाढत गेला, मात्र प्रत्यक्ष संघर्षाची ठिणगी पडली नाही. त्याचीच पुनरावृत्ती होणे आताही अपेक्षित आहे. अमेरिकेच्या `अफ-पाक' धोरणाचे काय होणार? ================================================================================ सचिन दिवाण on 21 December, 2010 04:30:00 AM अमेरिकी नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणणा-या अल्-काइदाचे तळ अफगाणिस्तानसह पाकिस्तानातही आहेत. अफगाणिस्तानात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू झाली की ते दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेतात. अफगाणिस्तानात आपापसांत लढणारे विविध वांशिक गट, तालिबान, त्यांच्या पाठीशी उभी असलेली ‘आयएसआय’ ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना या सगळ्यांचे साटेलोटे विचारात घेता अल्-काइदाचे पारिपत्य करण्यासाठी अफगाणिस्तान-पाकिस्तान या देशांचा एकत्रित विचार करणे गरजेचे होते. तेच नव्या ‘अफ-पाक’ धोरणाने अधोरेखित केले. महाशक्तीचे पुन्हा वस्त्रहरण ================================================================================ विजय बनसोडे on 06 December, 2010 04:00:00 AM अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी जगभरातील अमेरिकी दूतावासांना परकीय मुत्सद्यांची इत्थंभूत माहिती संकलित करण्याचे त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिका-यांवरही ‘नजर ठेवण्याचे’ आदेश दिले होते. ‘विकिलीक्स’च्या गौप्यस्फोटांतून हे चव्हाटय़ावर आल्याने खळबळ उडाली आहे. पण ‘व्हाइट हाऊस’चे माध्यम सचिव रॉबर्ट गिब्ज मात्र ‘तसे आदेश नव्हतेच’, असे ठासून सांगतात. ‘विकिलीक्स’ने याच वर्षाच्या आरंभाला अफगाणिस्तानच्या संदर्भातील सुमारे 92,000 आणि इराकशी निगडित अंदाजे चार लाख दस्तऐवज ‘फोडले’ होते. त्यानंतर या संकेतस्थळाने जगभरातील 274 दूतावासांनी वॉशिंग्टनला पाठवलेल्या ‘केबल्स’ फोडण्यास सुरुवात केली आहे. या 2,51,287 दस्तऐवजांपैकी फक्त15,652 केबल’ गोपनीय आहेत. जगभरातील दूतावासांनी दैनंदिन कामकाजासंदर्भात वॉशिंग्टनला धाडलेले खलिते, असेच त्यांचे स्वरूप आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण, गृह, उद्योग, अर्थ इत्यादी खात्यांच्या गोपनीय दस्तऐवजांचा समावेश नाही. तरीही या ‘किरकोळ’ गौप्यस्फोटांमुळे अमेरिकी राज्यकर्त्यांची त्रेधातिरपीट का उडाली, हा प्रश्न उभा राहतो. ‘विकिलीक्स’च्या पोहऱ्यातच इतके, तर ‘अंकल सॅम’च्या आडात किती आणि काय आहे, ते जगाला समजेल, ही धास्ती तर त्यामागे नसावी