पहिले पान | महाकौल 2012 | कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे जिंकलो

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे जिंकलो

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

माझ्या राजकीय कारकि र्दीची सुरुवात युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता पदापासून झाली. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.

माझ्या राजकीय कारकि र्दीची सुरुवात युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता पदापासून झाली. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. काँग्रेसने 1992 मध्ये मला पहिल्यांदा शीव-कोळीवाडा येथून उमेदवारी दिली. निवडून आल्यानंतर मूलभूत सुविधा पुरवेन,’ असे आश्वासन मी त्यावेळी मतदारांना दिले होते. मतदारांनी त्यावर विश्वास ठेवून मला सहा हजार मताधिक्क्याने निवडून दिले.

 

माझ्या मतदारसंघात प्रामुख्याने झोपडपट्टय़ा असल्याने तेथे सांडपाण्याचा निचरा, अपुरा आणि अस्वच्छ पाणीपुरवठा, गटारे आणि प्रसाधनगृहे, महापालिकेच्या शाळांमधील अपु-या सुविधा आदी समस्या होत्या. महापालिकेकडून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळवून त्या बऱ्याचशा दूर केल्या. त्यामुळे मतदारांचा माझ्यावरील विश्वास दृढ झाला. पहिल्या निवडणुकीच्या वेळी मी 14 ते 16 तास प्रचार केला. मी निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनीही बरीच मेहनत घेतली. त्यांची अहोरात्र मेहनत आणि माझा निवडणुकीचा खर्च दोन ते अडीच लाख रुपयांवर पोहोचल्याने ती चांगलीच गाजली. १९९२ मध्ये निवडणूक आचारसंहितेचा बागुलबुवा नव्हता. यामुळे प्रचारासाठी फलक, बॅनर, होर्डिग लावण्यास बंधन नव्हते. त्या वेळी जनता दलाचे सुहास बने प्रतिस्पर्धी उमेदवार होते. पण आमच्यात वादावादीचे, आरोप-प्रत्यारोपांचे प्रसंग कधीच घडले नाहीत. पण 1997 मध्ये शशी सावंत पराभूत झाल्याने मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली होती. दुस-या वेळी खर्च मात्र 85 हजार रुपये आला होता. मी 97 नंतर 2007 मध्ये पुन्हा निवडून आलो. यापूर्वी झालेल्या तिनही निवडणुकांच्या वेळी मी प्रचार करताना विकासाच्या मुद्यावर मते मागितली आणि निवडून आल्यावर त्याची पूर्तता केली. यंदा मी पुन्हा उभा असून, शिवसेनेच्या महापौर श्रद्धा जाधव माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. महापौर असूनही त्यांनी प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्या लोकांना भेटतही नसल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. लोकांच्या सहभागाने मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे,’ हा माझा प्रचाराचा मुद्दा आहे.

 शब्दांकन : भालचंद्र देव

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0