पहिले पान | महाराष्ट्र | सामान्यांच्या प्रश्नांना ‘प्रहार’ने वाचा फोडावी

सामान्यांच्या प्रश्नांना ‘प्रहार’ने वाचा फोडावी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या वर्षभरात गौरवास्पद नावलौकिक मिळवणा-या ‘प्रहार’ने सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री आणि ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी ‘प्रहार’च्या सावंतवाडी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

सावंतवाडी- वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या वर्षभरात गौरवास्पद नावलौकिक मिळवणा-या प्रहारची सामाजिक, शैक्षणिक आदी विधायक माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत तात्काळ पोहोचवणारे वृत्तपत्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे. प्रहारने अशीच प्रगती करावी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन मंगळवारी राज्याचे महसूलमंत्री आणि प्रहारचे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी प्रहारच्या सावंतवाडी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

 

सावंतवाडी-रामेश्वर प्लाझा येथे प्रहारच्या सावंतवाडी कार्यालयाचे उद्घाटन नीलमताई राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार डॉ. निलेश राणे, आमदार राजन तेली, प्रहारचे कार्यकारी संपादक शशी सावंत, निवासी संपादक संतोष वायंगणकर, नगराध्यक्ष पल्लवी के सरकर, जि. प. अध्यक्ष रेखा कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गजानन गावडे आदी उपस्थित होते.

 

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे प्रहारच्या आवृत्त्या सुरू होणार आहेत. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणीही प्रहार उपलब्ध होईल, असे राणे यांनी या वेळी जाहीर केले. प्रामाणिकपणा आणि सत्याच्या जोरावर प्रहारने मुंबई आणि कोकणात प्रगती केली आहे. विधायक विकासकामांना सातत्याने पाठबळ दिले आहे, असेही राणे यांनी सांगितले.

 प्रहारचे असंख्य वाचक  या वेळी उपस्थित होते. सावंतवाडी कार्यालयाचे प्रमुख नंदू पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0