पहिले पान | महाराष्ट्र | विद्यार्थ्याला मारणा-या शिक्षकाला चोप

विद्यार्थ्याला मारणा-या शिक्षकाला चोप

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील जे. आर. दोद्दन्ना या शाळेतील विद्यार्थ्यांला कन्नडधार्जिण्या शिक्षकाने मारहाण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. या घटनेनंतर शाळेत जाब विचारायला गेलेल्या ग्रामस्थांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला.

बेळगाव- सीमाभागात मराठी भाषकांची सातत्याने गळचेपी होत असून त्याचे परिणाम शाळांतही जाणवू लागले आहेत. बेळगाव तालुक्यातील हलगा येथील जे. आर. दोद्दन्ना या शाळेतील विद्यार्थ्यांला कन्नडधार्जिण्या शिक्षकाने मारहाण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. या मारहाणीत विद्यार्थ्यांचे तोंड सुजून डोळ्याला इजा झाली आहे. या घटनेनंतर शाळेत जाब विचारायला गेलेल्या ग्रामस्थांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला.

 

हलगा येथील जे. आर. दोद्दन्ना या शाळेत कन्नड आणि मराठी असे दोन्ही भाषक विद्यार्थी एकत्र शिकत आहेत. शाळेचे प्रशासन कन्नड लोकांच्या हाती असल्याने येथे मराठी शिकणा-या विद्यार्थ्यांना याचा नेहमीच त्रास होतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत मिठाई आणण्यात आली होती. ही मिठाई कुठल्या तरी मराठी विद्यार्थ्यांने घेतल्याचा राग मनात आल्याने कन्नडधार्जिण्या प्रशांत पाटील या शिक्षकाने राजू मोरे आणि त्याच्या एका मित्रास मराठीद्वेषापोटी मारहाण केली. या मारहाणीत राजू मोरे याचे तोंड सुजून डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

 

प्रशांत पाटील हा शिक्षक नुकताच या शाळेत रुजू झाला असून तो कन्नड रक्षण वेदिकेचा कार्यकर्ता असल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली. प्रशांत पाटील याने विद्यार्थ्यांना का मारले, याचा जाब त्यांनी विचारला, मात्र ग्रामस्थांना नीट उत्तर न देता त्याने टोलवाटोलवी केली. त्याचा राग आल्याने ग्रामस्थांनी आणि काही युवकांनी मिळून पाटीलला बेदम चोपले.

 

याशिवाय तिथेच असलेल्या ग्रामपंचायत सदस्यालाही मारहाण केली. या घटनेची तीव्रता पाहता काही विपरित घडू नये, याकरिता शाळा सुधारणा समिती गावातील पंच आणि मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत समेट घडवून आणण्यात आली. त्या वेळी प्रशांत पाटील या शिक्षकाने जखमी विद्यार्थ्यांची माफी मागितली व त्याचा सगळा वैद्यकीय खर्च करण्याचे कबूल केले.

 यानंतर काही युवकांनी हे प्रकरण जिल्हा शिक्षण अधिका-यांकडे नेणार असल्याचे सूतोवाच केले. शाळा कन्नडधार्जिणी असल्याने शिक्षकाला झालेली मारहाण योग्य असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तर राजू मोरे याच्यावर उपचार सुरू आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0