पहिले पान | महाराष्ट्र | वेंगुर्ल्यात उतरले परदेशी पाहुणे

वेंगुर्ल्यात उतरले परदेशी पाहुणे

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गेल्या काही दिवसांपासून वेंगुर्ले-परबवाडा येथील पाणवठय़ाच्या ठिकाणी दुर्मीळ समजले जाणारे ‘सायबेरीयन क्रेन’ हे पक्षी मुक्कामासाठी आले आहेत.

वेंगुर्ले- सिंधुदुर्गाचे सौंदर्य परदेशी पर्यटकांनाच नव्हे तर परदेशी स्थलांतरित पक्ष्यांनाही खुणावते.. गेल्या काही  दिवसांपासून वेंगुर्ले-परबवाडा येथील पाणवठय़ाच्या ठिकाणी दुर्मीळ समजले जाणारे सायबेरीयन क्रेन हे पक्षी मुक्कामासाठी आले आहेत.

 

सायबेरीयन क्रेन हे पक्षी या काळात उत्तरेत थंडीचा कडाका वाढू लागताच तेथून स्थलांतर करतात. जवळपास अडीच-पावणेतीन फूट लांबीचा हा पक्षी उभा राहिला की त्याची उंचीही तेवढीच भरते. या पक्षाची चोचही लांब असते. साधारण राखाडी रंगाचा हा पक्षी देखणा दिसतो. त्याच्या पंखाचा टोकाकडचा भाग अर्ध्या बाजूने काळा असतो. सायबेरीयामध्ये या पक्षाचे वास्तव्य जास्त असते. पाणवठय़ातील पाणवनस्पतीतील कीटक हे त्यांचे भक्ष्य. निसर्गमंचचे सदस्य राजेश परब यांनी ही माहिती दिली.

 

हे पक्षी आता वेंगुर्ल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. परबवाडा येथील आरोग्य उपकेंद्राशेजारील पाणवठय़ाच्या ठिकाणी त्यांचे थवे दिसून येत आहेत. हजारो मैल उड्डाण करू शकणारा हा पक्षी आकाशात भरारी घेतानाचे दृश्य नयनरम्य असेच असते. उड्डाण करण्याचीही या पक्षाची विशिष्ट ढब असल्याने दुरूनही तो सहज ओळखता येतो.

 कोकणात अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करून येत असतात. आजगांव-सावंतवाडी येथील पाणथळ भागात गेल्या वर्षी एशियन ओपन बिल स्टॉर्क हे पक्षी दिसून आले होते. या व्यतिरिक्त सीगल यांचेही दर्शन किनारी भागात हंगामात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणा-या या परदेशी पाहुण्या पक्ष्यांप्रमाणे कोकणात आढळणारे पक्षी एकत्र पाहायला मिळावे यासाठीच वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील लाइटहाउस समोरील बर्ड आयलँडवर पक्षी अभयारण्य होत आहे. येथील पाणवठय़ाच्या ठिकाणी दरवर्षी येणा-या या परदेशी पाहुण्यांना स्थिरावण्यासाठी पाणवठय़ांचे संवर्धन होणेही गरजेचे आहे, अशी मागणी येथील पक्षीमित्र करत आहेत.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0