PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार ================================================================================ एजन्सीज on 10 March, 2010 12:25:00 PM जालना- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. रामगव्हाण येथील बाळू नागरे आणि त्यांच्या मित्रांनी पारधी समाजातील दोन मुलींची छेड काढली. यानंतर पारधी समाजातील लोकांशी आणि बाळू नागरे यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. बाळू नागरे यांनी स्वतःजवळ असलेली बंदूक काढून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पारधी समाजातील वर्धमान पवार हा ठार झाला. शेतातील पायवाटेवरून गेल्या अनेक दिवसांपासून या दोन गटांमध्ये वाद सुरू होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.