पहिले पान | महाराष्ट्र | औद्योगिक प्रगतीत किर्लोस्करांचे मोठे योगदान

औद्योगिक प्रगतीत किर्लोस्करांचे मोठे योगदान

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

देशातील औद्योगिक प्रगतीचा इतिहास किर्लोस्कर कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय पुरा होत नाही, असे प्रशंसोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी किर्लोस्करवाडीत व्यक्त केले.

सांगली- देशातील औद्योगिक प्रगतीचा इतिहास किर्लोस्कर कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय पुरा होत नाही, असे प्रशंसोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी किर्लोस्करवाडीत व्यक्त केले. किर्लोस्कर कारखान्याचे संस्थापक लक्ष्मणराव किलरेस्कर यांनी स्थापन केलेल्या किर्लोस्करवाडी या गावाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त किर्लोस्करवाडीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने व कष्टाने मात करून यश संपादन करता येते, असा मंत्र किर्लोस्कर उद्योग समूहाने देशाला दिल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. सविता भावे लिखित क था किर्लोस्करवाडीचीया पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. आधी बीज एकलेया टेलिफिल्मच्या सीडीचे प्रकाशन सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम व आयसीपी पंपांचे अनावरण ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

 

किलरेस्करांनी शेतीला नवी दिशा दिली. पंप्स हीच किर्लोस्करांची जगभर ओळख बनली आहे. स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार करीत, कळत-नकळत स्वातंत्र्य आंदोलनास किर्लोस्करांनी मदत केली आहे. भारतीय लोक जागतिक दर्जाचे उत्तम काम करू शकतात, हे किर्लोस्करांनी सर्वप्रथम दाखवून दिले आहे, असेही पवार म्हणाले. 

 किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी आजपर्यंतच्या प्रवासात अनेकांचे सहकार्य लाभल्याचे सांगत, येत्या पाच वर्षात किर्लोस्कर ब्रदर्स जगातील पहिल्या पाच पंप उत्पादक कंपन्यात स्थान मिळवेल, असा निर्धार व्यक्त केला. किर्लोस्करांना सुरुवातीच्या अडचणीच्या काळात आर्थिक मदत केलेले बेळगावचे सावकार मोतीलाल गिंडे, पुण्याचे जगन्नाथ महाराज पंडित यांचा यावेळी सत्कार झाला. देवाप्पा चवनाप्पा चौगुले व बाबू संतू मदवाने या दोन सेवानिवृत्त कामगारांचा आणि विक्रेते रवींद्र कांबळे, रामचंद्र आणि कंपनी व शेखर तळवळकर, माजी अधिकारी प्र.द.गुणे, कामगार नेते नाना मगर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात किर्लोस्कर उद्योगातील माजी अधिकारी ए.आर.जेमीनीज यांची कन्या शर्वरी जेमीनीज हिने पृथ्वीची व्यथाया संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार सादर केला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0