पहिले पान | महाराष्ट्र | महिलांची दगडखाणीवर धडक

महिलांची दगडखाणीवर धडक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आमणे गावच्या हद्दीत अतिक्रमण करून सुरू असलेल्या दगडखाणीत दररोज केल्या जाणा-या सुरुंग स्फोटांमुळे आमणेसह शेजारील सावद आणि लोणाद या गावांतील घरांना तडे गेले आहेत.

भिवंडी- आमणे गावच्या हद्दीत अतिक्रमण करून सुरू असलेल्या दगडखाणीत दररोज केल्या जाणा-या सुरुंग स्फोटांमुळे आमणेसह शेजारील सावद आणि लोणाद या गावांतील घरांना तडे गेले आहेत. या दगडखाणीतून उडणा-या दगडाच्या पावडरमुळे परिसरातील गावक-यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावक-यांनी बुधवारी धडक मोर्चा काढून त्या दगडखाणीचे काम दोन तास बंद पाडले होते.

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी परेश पाटील आणि रमेश पाटील यांना दगडखाण उभारण्यासाठी आमणे गावच्या हद्दीतील गुरुचरण जमीन सर्वेक्षण क्रमांक २१०मध्ये  प्रत्येकी दोन हेक्टरची जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र या दोघांनी परिसरातील २५ एकर जागेवरही अतिक्रमण केले आहे. या संपूर्ण जागेवर उभारण्यात आलेली दगडखाणीत दगडावर ब्लास्टिंग करताना बोरब्लास्टिंग होत असल्याने सुरुंगस्फोटांमुळे आमणेपाडा आणि आमणे गावातील शाळा, दुकाने, ग्रामपंचायत कार्यालयांसह सुमारे तडे गेले आहेत. काही घरे तर कोसळण्याच्या मार्गावर आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या सुरुंगस्फोटांमुळे बसत असलेल्या हाद-यांमुळे घरांतील भांडीकुंडीही खाली पडत आहेत.

या दगडखाणीतून क्रशर मशिनमधून निघणा-या पावडरमुळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे गावक-यांच्या जिवाला धोका पोहोचत आहे. या पावडरमुळे परिसरातील भाजीपाल्याची तसेच अन्य पिकेही धोक्यात आली आहेत, अशी माहिती आमणे गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक मंडपेकर तसेच सुरेश पाटील यांनी दिली.

 गावक-यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी ही दगडखाण तसेच क्रशर मशिन बंद करण्याच्या मागणीसाठी आमणे गावातील जागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजना काकडे, सरपंच कल्पना पाटील, सदस्य प्रदीप पाटील आणि नर्मदा भोईर यांच्या नेतृत्वाखीलील परिसरातील शेकडो गावक-यांनी क्रशर मशिन प्लॉटवर तसेच दगडखाणीवर धडक देऊन तेथील काम बंद पाडले. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामपंचायतील शुक्रवारी दुपारी बारा वाजता विशेष ग्रामसभाही बोलावली आहे, अशी माहिती ग्रामसेविका नलिनी पाटील यांनी दिली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0