पहिले पान | महाराष्ट्र | करुळ घाटात कठडय़ांचे बांधकाम

करुळ घाटात कठडय़ांचे बांधकाम

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

करुळ घाटमार्गाची गेल्या पाच वर्षांत दुरवस्था झाली होती. निकृष्ट दर्जाचे आणि ढासळू लागलेले संरक्षककठडे तसेच काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यामुळे हा घाट धोकादायक बनला होता. या घाटातील रस्ते आणि कठडय़ांच्या डागडुजीचे काम आता सुरू झाले आहे

वैभववाडी- करुळ घाटात दरवर्षी घडणा-या अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठडे बांधले जात आहेत. मात्र ऐन पावसात केल्या जाणाऱ्या बांधकामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. घाटातील काही धोकादायक वळणांवर पोलादी कठडे बसवले जात असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

 

करुळ घाटमार्गाची गेल्या पाच वर्षांत दुरवस्था झाली होती. निकृष्ट दर्जाचे आणि ढासळू लागलेले संरक्षककठडे तसेच काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यामुळे हा घाट धोकादायक बनला होता. या घाटातील रस्ते आणि कठडय़ांच्या डागडुजीचे काम आता सुरू झाले आहे. यापूर्वी गॅबियनपध्दतीच्या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या. घाटात अपघात घडू नये, यासाठी धोकादायक वळणांवर आता (क्रॅश बॅरिअर) पोलादी कठडे बसवण्यात आले आहेत. पाच ठिकाणी पोलादी तर तीन ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे संरक्षक कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहेत. परंतु पाया न घालताच कठडे उभारण्यात आल्याने तसेच ऐन पावसात ही कामे झाल्याने ती किती दिवस टिकतील याबाबत शंका निर्माण झाली आहे.

 करुळ घाटातील द-या पाचशे ते सहाशे फूट खोल आहेत. रस्त्यावरील संरक्षक कठडे तोडून वाहने दरीत कोसळल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोटय़वधी रुपये खर्च करून संरक्षक कठडे उभारताना त्यांचा दर्जा उच्च राहील, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम खात्याने घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0