पहिले पान | महाराष्ट्र | मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्शी फाट्याजवळ झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले आहेत.

धुळे-  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्शी (ता.शिंदखेडा) फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा मिनीट्रक झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर, अंदाजे 40 मजूर जखमी झाले. जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये वत्सलाबाई कोळी (38), गोकुळाबाई भिल्ल (50), मुल्कनबाई भिल्ल (60), नगिना पिंजारी (60), अबिदा पिंजारी (40) आणि जोधाबाई भिल्ल (40) यांचा समावेश आहे.  बुधवारी सकाळी विखरण (ता.शिरपूर) परिसरातील 40 ते 50 मजूर वारूळ पाष्टे गावाकडे जात होते. वर्शी फाटय़ाजवळ समोरील वाहनाला ओलांडण्याच्या प्रयत्नात मजूरांची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याजवळील झाडावर आदळला. अपघाताचे वृत्त कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरूवात केली. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले.  

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0