PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा ठार मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 01 September, 2010 07:39:00 PM धुळे- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्शी (ता.शिंदखेडा) फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा मिनीट्रक झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर, अंदाजे 40 मजूर जखमी झाले. जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये वत्सलाबाई कोळी (38), गोकुळाबाई भिल्ल (50), मुल्कनबाई भिल्ल (60), नगिना पिंजारी (60), अबिदा पिंजारी (40) आणि जोधाबाई भिल्ल (40) यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी विखरण (ता.शिरपूर) परिसरातील 40 ते 50 मजूर वारूळ पाष्टे गावाकडे जात होते. वर्शी फाटय़ाजवळ समोरील वाहनाला ओलांडण्याच्या प्रयत्नात मजूरांची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याजवळील झाडावर आदळला. अपघाताचे वृत्त कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरूवात केली. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले.