पहिले पान | महाराष्ट्र | कापसाला 4500 हमीभाव द्यावा

कापसाला 4500 हमीभाव द्यावा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

अतिवृष्टीमुळे देशभरातील 110 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक धोक्यात आल्याने त्याचा शेतक-यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.

वर्धा- अतिवृष्टीमुळे देशभरातील 110 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक धोक्यात आल्याने त्याचा शेतक-यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

यंदा बीटी बियाणांची विक्रमी 110 हेक्टरवर पेरणी करण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र 42 लाख हेक्टर असून त्यातील तब्बल 28 लाख क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतक-यांची चिंता वाढली आहे. कापसावर प्रत्येक शेतक-याला हेक्टरमागे 25 हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हे पीक धोक्यात आल्यास शेतक-यांना 27 हजार 500 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. कापसाचे पीक लावण्यातही शेतक-यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे.

विदर्भातील शेतक-यांनी केवळ पेरणीसाठी सात हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र मजुरी व खताच्या कमतरतेमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे बँकांनी अर्थपुरवठा करण्यास हात आखडता घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पश्चिम विदर्भातील हे कृषिसंकट आता संपूर्ण विदर्भासह मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातही पसरले आहे. त्यामुळे 30 लाख शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाचा हमीभाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल करणे आवश्यक आहे, असे समितीच्या किशोर तिवारी यांनी सांगितले. पेरणीच्या एकूण खर्चाचा तपशील केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. कापसाचा हमीभाव न वाढल्यास गिरणी मालक व व्यापा-यांकडून शेतक-यांची आणखी पिळवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हमीभावाची मागणी मान्य करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे तिवारी म्हणाले. 

कपाशीवर पांढरी माशीचा प्रादुर्भाव

विदर्भातील कपाशीच्या पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसह पांढरी माशी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्या पोषक हवामान असल्याने या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडीचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिका-यांनी सांगितले. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना केले जाईल, असे कृषी अधिका-यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0