‘दादोजीं’संदर्भात समिती नेमण्याबाबत दिरंगाई
पुण्यातील लाल महालामध्ये असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 24 तासांत हटवण्याचे आदेश महापौरांनी प्रथम दिले होते. पण आता त्यांनी यासंदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय शिवप्रेमींची दिशाभूल आहे, असा आरोप लोकशासन आंदोलनाने केला.
पुणे- दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवरायांचे गुरू असल्याचा कोणताही संदर्भ इतिहासात उपलब्ध नसल्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेल्या इतिहासतज्ज्ञांच्या समितीने 2008 मध्येच स्पष्ट केले होते. त्यामुळे यासंदर्भात समिती नियुक्त करण्याचा पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांचा निर्णय वेळकाढूपणाचा आहे, असा आरोप लोकशासन आंदोलनाच्या वतीने करण्यात आला.
पुण्यातील लाल महालामध्ये असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 24 तासांत हटवण्याचे आदेश महापौरांनी प्रथम दिले होते. पण आता त्यांनी यासंदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय शिवप्रेमींची दिशाभूल आहे, असा आरोप लोकशासन आंदोलनाने केला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवरायांचे गुरू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारनेही हे मान्य केले आहे. तरीही पुण्याचे महापौर त्याबाबत समिती का नेमत आहे, असा सवाल आंदोलनाच्या वतीने करण्यात आला.
पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेवक केवळ राजकारणापोटी स्वार्थी व संधिसाधू भूमिका घेत आहे. 6 सप्टेंबर रोजी महापालिकेच्या होणा-या सर्वसाधारण बैठकीत लाल महालातील दादोजींचा पुतळा हटवण्याचा निर्णय झाला नाही तर, आंदोलन छेडण्यात येईल आणि नगरसेवकांना रस्त्यावर फिरून देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिला.- बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा