पहिले पान | महाराष्ट्र | पिंपरीत एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

पिंपरीत एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पिंपरीमध्ये शुक्रवारी सकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आली.

पुणे-  पिंपरीमध्ये शुक्रवारी सकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   ज्योत्स्ना बागूल (20) असे मृत युवतीचे नाव आहे.  ज्योत्स्नावर तिचा आतेभाऊ योगेश बच्छाव (25) यानेच हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ नाशिकची असलेली ज्योत्स्ना पिंपरी येथील डी.वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयात तिस-या वर्षाला शिकत होती.  तिच्यावर योगेशचे एकतर्फी प्रेम होते. पण ज्योत्स्नाने त्याला नकार दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या योगेशने शुक्रवारी सकाळी  ज्योत्स्ना  तिच्या मैत्रीणीसोबत  महाविद्यालयाला जात असताना वाळवेकर वाडीजवळ  तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. यामध्ये ज्योत्स्ना जागीच ठार झाली. त्यानंतर योगेशने स्वतःवरही वार केले. त्याला तत्काळ नजीकच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

योगेश हा तळेगाव येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0