पहिले पान | महाराष्ट्र | येरवडा तुरुंग अधीक्षकांना नोटिस

येरवडा तुरुंग अधीक्षकांना नोटिस

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पुण्यातील येरवडा तुरुंगाच्या अधीक्षकांना न्यायालयाच्या अवमानाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावली आहे.

मुंबई- गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या एका महिला कैद्याला उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही पुण्यातील येरवडा तुरुंगाच्या अधीक्षकांनी त्याचे पालन न केल्याने शुक्रवारी उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच या अधीक्षकांना न्यायालयाच्या अवमानाबद्दल कारणे दाखवानोटिसही बजावली. तसेच पुढील तारखेच्या सुनावणीस त्यांना हजर राहण्यास सांगताना त्यासाठीचा खर्च स्वत:च्या खिशातूनच करायचा, असाही आदेश न्यायालयाने दिला.

 एका हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली नाशिकमधील शालिनी यादव हिने आतापर्यंत नऊ वर्षाची शिक्षा भोगली आहे. गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने त्यावर उपचार करून घेण्यासाठी तिने काही महिन्यांपूर्वी न्यायालयाकडून हंगामी जामीन मंजूर करून घेतला होता. त्याची मुदत 31 मार्चला संपल्यानंतर तिने पुन्हा न्यायालयाकडून पॅरोलघेऊन पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, पुण्यात या कर्करोगावरील उपचारांसंबंधी आवश्यक त्या सुविधा नसल्याचे सांगून तिने पॅरोलवाढवून देण्याची विनंती एका अर्जाद्वारे केली होती. त्यावर न्या. बी. एच. मार्लापल्ले यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शालिनीला आवश्यकता भासल्यास तिला उपचारांसाठी टाटा स्मारक रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश सहा मे रोजी दिले होते. मात्र प्रत्यक्षात तिला मुंबईत हलवण्यात आले नाही.

या पार्श्वभूमीवर, शालिनीने उच्च न्यायालयात पुन्हा एकदा हंगामी जामिनासाठी अर्ज केला. तो शुक्रवारी न्या. ए. एम. खानविलकर व न्या. यु. डी. साळवी यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आला. तेव्हा शालिनीच्या वकील इंद्रायणी कोपरकर यांनी, तुरुंग प्रशासनाने न्यायालयीन आदेश असतानाही शालिनीला मुंबईत हलवलेच नसल्याचे निदर्शनास आणले. याबद्दल खंडपीठाने विचारणा केली असता शालिनीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र, ‘ती कैदी आहे म्हणून तिला उपचार घेता येऊ नयेत का? मग न्यायालयाच्या आदेशाचे पालन का झाले नाही’, या न्यायालयाच्या प्रश्नांवर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. अखेर तुरुंग अधीक्षकांच्या वागणुकीबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच खंडपीठाने त्यांना वरीलप्रमाणे नोटिस बजावली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0