PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: औरंगाबादमध्ये शिक्षकाच्या हल्ल्यात शिक्षक ठार औरंगाबादमध्ये शिक्षकाच्या हल्ल्यात शिक्षक ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 27 January, 2012 09:30:00 PM औरंगाबाद- येथील सुशिलादेवी विद्यालयात दोन शिक्षकांचा वाद झाल्यानंतर एकाने दुस-यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले. राजकुमार लांडगे हे मृत शिक्षकाचे नाव असून त्याला ठार करणा-या लक्ष्मण कुऱ्हे याला पोलिसांनी अटक केली. शाळा प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करत लांडगे यांच्या नातलगांनी त्यांचा मृतदेह शाळेच्या पटांगणात ठेवला आणि पोलिस शाळेवर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर लांडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.