जीप-ट्रकच्या धडकेत चार ठार
अमरावती परतवडा मार्गावर आसेगाव नजीक झालेल्या कालीपीली जीप आणि ट्रक मधे धडक बसून घडलेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत.
अमरावती- अमरावती परतवडा मार्गावर आसेगाव नजीक झालेल्या कालीपीली जीप आणि ट्रक मधे धडक बसून घडलेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यापैकी चौघंची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमधे जीपचा चालक आणि तीन शिक्षकांचा समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात आसेगाव नजीक पूर्णा नगर फाटय़ावर घडला. प्रवाशांना घेऊन जीप अमरावतीहून परतवाडय़ाकडे जात होती. परतवाडय़ाकडून येणा-या या ट्रकचे स्टेअिरग तुटल्याने तो अचानक रस्त्यातच उभा राहिला. त्याचवेळी भरधाव जाणारी जीप ट्रॅकवर आदळली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधे रिजवणा पारविन याकुब शहा (30), मोहमद शदिक मोहमद अयुब (29), इब्राहीम खान हबीब खान (29) आणि जीपचा चालक संदीप वसंत मोरे (35) यांचा समावेश आहे. तर जखमींमधे तस्मी मोहमद हबीब, उत्तम बाबन जवंजळ, सौकाट हुसे तस्नीम हुसेन, रकसब पुरा, जबीद खान बिस्मिल्ला खान, रियसतबी शेख, मोहमद नाजीम अ.राहीम, सद फारुख सढसन, असाद मजिद अब्दुल सिद्दिकी, अब्दुल आसीम अब्दुल रहिम, राजेश ठाकरे आणि ट्रक चालक इम्रान खान हबीब खान यांचा समावेश आहे. दोन्ही वाहने एकमेकात फसली होती. त्यांना वेगळे करून जखमींना बाहेर काढणे मोठे अवघड झाले होते. अपघातात मृत्यू पावलेल्या चालकाव्यतिरिक्त अन्य तिघे शिक्षक होते.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा