PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महागाईला अनेकविध बाबी जबाबदार- पवार महागाईला अनेकविध बाबी जबाबदार- पवार ================================================================================ पीटीआय on 07 February, 2010 09:40:00 PM औरंगाबाद- वाढत्या महागाईमागे अनेकविध कारणे असून त्याची जबाबदारी आपल्या एकट्यावर टाकणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे केला. ग्रामीण भागातून निर्माण होणा-या निधीवर देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यावर्षी नैसर्गिक आपदांमुळे ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा अनेक बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत, असे पवार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीत म्हणाले. आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बोलीच न लागणे तसेच शाहरुख खानने पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या समावेशाबाबत केलेल्या विधानावरून उठलेल्या वादंगाबाबत विचारले असता, राजकारण आणि खेळाची गल्लत करू नये, असे पवार म्हणाले.