PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र प्रत्येक विभागात दुष्काळ निवारण समिती ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 May, 2012 10:10:00 AM राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी टंचाईग्रस्त भागांत जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. नवविवाहितेवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 10:55:00 PM नवविवाहितेची पतीनेच हत्या केली असल्याचा आरोप करून संतापलेल्या तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या पार्थिवावर सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. नक्षलींच्या भीतीने उपसरपंचाचा राजीनामा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 11:55:00 PM नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीमुळे आणि त्यांच्या सुरू असलेल्या हिंसक कारवायांमुळे या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात एटापल्लीचे उपसरपंच रमेश गंपावार यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 10:51:00 PM पुण्यासह राज्याच्या विविध भागांत मंगळवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. विद्यार्थी घडवण्यासाठी उत्तम शिक्षकांची गरज ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 May, 2012 03:25:00 AM रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्तावाढीसाठी संस्थेच्या वतीने यंदापासून ‘स्व. यशवंतराव चव्हाण आउटस्टॅँडिंग अचिव्हमेंट पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली. मालेगावात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 10:13:00 PM विहिरीवर पाणी भरण्यासाठी जमलेल्या गर्दीत काही महिलांचा धक्का लागल्याने सखूबाई लोटन सोनावणे (45) या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पर्सिसन जाळ्याच्या वापराला विरोध ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 May, 2012 04:00:00 AM पर्सिसन जाळ्यांमुळे मत्स्यबीजाची हानी होते. या जाळ्यामुळे बेसुमार मासेमारी केली जात असून, छोटय़ा मच्छीमारांना खोल समुद्रातही मासे मिळत नसल्याची माहिती मच्छीमार संघटनांनी दिली आहे. तारापूरमध्ये टँकरलॉबी सक्रिय ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 May, 2012 03:05:00 AM वसई-विरारमधील टँकरमालकांनी तेथील गाशा गुंडाळला असला तरी आता तारापूर औद्योगिक वसाहतीत मात्र टँकर लॉबीने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे औद्योगिक क्षेत्रात पाणी विकून टँकरमालकांनी उखळ पांढरे करायला सुरू केले आहे. दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज आठ दिवसांत- पवार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 07:52:00 PM मी दिल्लीला गेल्यावर आठ दिवसांच्या आत या पॅकेजची घोषणा केली जाईल’’ असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी दिले. नाशिकच्या महिंद्रा कंपनीत भीषण आग ================================================================================ पीटीआय on 09 May, 2012 05:00:00 PM नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीतील स्पेअर पार्ट विभागाला बुधवारी पहाटे आग लागून 250 गाड्यांचे उत्पादन जळाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.