PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र चा-याची रक्कम मिळणार ऑनलाइन पद्धतीने ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 11:50:00 AM जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी विविध भागात चारा डेपो सुरू केले असून डेपो चालकांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. सोनोग्राफी सेंटर सील ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 11:45:00 AM अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील राईकवार रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने शनिवारी सील केले. आजी-माजी 24 नगरसेवकांना अटक ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 11:40:00 AM घरकुल घोटाळा प्रकरणातील 24 संशयित आजी-माजी नगरसेवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. औरंगाबादमध्ये बस झाडावर आदळून 20 जखमी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 11:30:00 AM सिल्लोड- अजिंठा महामार्गावर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले. कन्नड कार्यकर्त्यांची एसटीवर दगडफेक ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 10:45:00 AM येळ्ळूर येथे रविवारी होणा-या सीमावासींच्या मेळाव्यासाठी सीमा भागातील मराठी भाषक मोठय़ा प्रमाणावर येत असल्याने पित्त खवळलेल्या कन्नड संघटनांच्या काही लोकांनी शनिवारी निपाणीतील तवंदी येथे एसटीच्या बसवर दगडफेक करून ती जाळण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कट फसला ================================================================================ प्रहार वार्ताहर on 19 May, 2012 04:15:00 PM नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिसांनी संपूर्ण फौजफाट्यासह घटनास्थळी कुच केल्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कट फसला. परळीत 25 वर्षीय तरुणाची हत्या ================================================================================ पीटीआय on 19 May, 2012 04:30:00 PM बीड जिल्हयातील परळी तालू्क्यात लोणारवाडी येथे एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला असून दगडाने ठेचुन हत्या केली असल्याचे पोलिस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. बीडमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 19 May, 2012 03:45:00 PM गर्भपात करत असताना विजयमाला व्हटेकर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. शिक्षणात राजकारण नको ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 09:30:00 AM दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजकारण येता कामा नये, असे मत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. ‘बाळासाहेब थोरातांचे आमच्याकडे लक्षच नाही’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 12:30:00 PM ‘‘मराठवाडय़ाला दीड लाख टनांची आवश्यकता असताना 500 टन खत पुरवले आहे. आमच्यावर सर्वच मार्गानी अन्याय सुरू आहे. औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना अनेकदा सांगूनही त्यांचे लक्षच नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाडय़ाचीही पाहणी करावी. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही मदत करावी,’’ अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.