PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र राज्यात पावसाचा मुक्काम कायम ================================================================================ प्रहार प्रतिनिधी़ on 13 May, 2012 11:11:00 AM मे महिन्याची रखरख त्यात दुष्काळाचे चटके अशा भीषण परिस्थितीत राज्याच्या अनेक भागात मागील तीन दिवसांत हजेरी लावून पावसाने सुखद दिलासा दिला आहे. विश्व संत साहित्य संमेलन ================================================================================ प्रहार वार्ताहर on 13 May, 2012 10:53:00 AM विश्वायतन सदगुरू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानयोग प्रतिष्ठानातर्फे 17 वे अखिल विश्व संत साहित्य संमेलन 15 ते 22 मे दरम्यान वेरूळ येथे होणार आहे. बारामती तालुक्यात सात गावांत चारा डेपो ================================================================================ प्रहार वार्ताहर on 13 May, 2012 10:44:00 AM बारामती तालुक्यातील जिरायती भागात चारा टंचाई दूर करण्यासाठी सवलतीच्या दरात चारा उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी चारा डेपोंची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार हिम्मतराव खराडे यांनी दिली. प्रा. सुहास पळशीकरांच्‍या कार्यालयावर हल्‍ला ================================================================================ पीटीआय on 12 May, 2012 03:30:00 PM प्रा. सुहास पळशीकरांच्या कार्यालयावर रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्त्यांनी हल्‍ला केल्याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली. सुमो आणि ट्रकच्या धडकेत तीन मुलांचा मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 03:45:00 PM लग्न समारंभ आटोपून गावाकडे परतणा-या टाटा सुमोला तिरोडा ते चिरेखनी दरम्यान शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव ट्रकने धडक दिल्याने सुमोतील दर्शन व्यंकटेश्‍वर भगत(6), सरिता मधूकर पारधी(12) आणि निशा भैय्यालाल पारधी(13) या तीन अल्पवयीन मुलांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तेंदुपत्ता तोडणा-या महिलेचा सपदंर्शाने मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 03:40:00 PM चार्मोशी तालुक्यातील मलेरा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यास गेलेल्या कमल मंडल (30) या विवाहित महिलेचा साप चावल्याने मृत्यू झाला. नक्षलवाद्यांच्या भितीने राजीनामा सत्र चालूच ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 01:45:00 PM एटापल्ली तालुक्यातील गेदा पंचायत समिती गणाचे सदस्य मंगेश हलामी आणि जांभीया ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर हिचामी यांनी राजीनामा दिला. राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस ================================================================================ (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून) on 12 May, 2012 01:00:00 PM राज्याच्या विविध भागांत पडत असलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी त्यामुळे द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या बागांचे तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागझि-यात 500 गवे ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 12:48:00 PM नागझिरा अभयारण्यात नुकत्याच झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत येथील वाघांच्या संख्येत घट झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी हरीण, चितळ, सांबर, रानगवे, जंगली कुत्रे आणि इतर प्रजातीचे प्राणी व पक्ष्यांची संख्या काही प्रमाणात वाढली असल्याचा दावा वन्यजीव विभागाच्या अधिका-यांनी केला आहे. आमदार माने यांनी धरणाचे दरवाजे उघडलें ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 12:44:00 PM मोहोळ तालुक्यातील सौंदणे कट येथील बंधा-याचे दरवाजे आमदार दिलीप माने यांनी स्वत: शेकडो शेतक-यांसह उघडले. त्यामुळे येथील पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.