PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र तटकरेंच्या विरोधातील याचिका फेटाळली ================================================================================ प्रहार प्रतिनिधी़ on 12 May, 2012 11:04:00 AM राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी नोंदीबाबतची माहिती दिली नसल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यास अटक ================================================================================ प्रहार वार्ताहर on 11 May, 2012 10:10:00 PM गडचिरोली- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांच्या ‘प्लाटून दलम ए’चा सदस्य नामे चैतु ऊर्फ श्यामसाय नैताम याला गुरुवारी अटक करण्यात आली. नक्षलींच्या उपकमांडरला पोलिस कोठडी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 11 May, 2012 04:25:00 PM सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केलेला नक्षलींचा उपकमांडर सुभाष उर्फ लालसाय वालको याला नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश गडचिरोली न्यायालयाने दिला आहे. नाशिकमध्ये विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ================================================================================ वृत्तसंस्था on 11 May, 2012 03:55:00 PM सिन्नर तालुक्‍यातील भोकानी येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी उपसत असताना विहिरीत पडून लता सोमनाथ डावखर (32) या महिलेचा मृत्यू झाला. ‘बाभळी’च्या वाटेवर भारनियमनाचे काटे ================================================================================ प्रहार वार्ताहर on 11 May, 2012 12:00:00 PM एखादा प्रकल्प पूर्ण करण्यात किती अडथळे येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधारा हे होय. मत्स्यव्यवसायही रोजगार हमी योजनेत ================================================================================ प्रहार प्रतिनिधी़ on 11 May, 2012 10:51:00 AM महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत प्रथमच मत्स्यव्यवसायही समाविष्ट करण्यात आला आहे. पटपडताळणीच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती ================================================================================ प्रहार वार्ताहर on 11 May, 2012 10:20:00 AM राज्यभरात राबवलेल्या पटपडताळणी मोहिमेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी गैरहजर आढळलेल्या संस्था व मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणे, शाळांची मान्यता रद्द करणे व अतिरिक्त शिक्षकांची सेवा समाप्त करणे, या सरकारच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हंगामी स्थगिती दिली. सीना धरणाचे पाणी सोलापूरला नाहीच ================================================================================ प्रहार वार्ताहर on 11 May, 2012 10:14:00 AM सीना-कोळेगाव धरणातून सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडण्यास उस्मानाबादमधील रहिवाशांनी तीव्र विरोध केल्याने प्रशासनाला हा निर्णय स्थगित करावा लागला. कोयना धरणाखाली भूकंपमापन प्रयोगशाळा ================================================================================ पीटीआय on 10 May, 2012 07:20:00 PM महाराष्ट्रातील महाकाय कोयना धरणाखाली होत असलेल्या भूगर्भीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी आठ किमी खोलीचे छिद्र पाडण्याची महत्त्वाकांक्षी योजना भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. नक्षलवाद्यांकडून सरपंचाची हत्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 May, 2012 01:30:00 PM गोंदिया जिल्ह्यातील चिचगड तालुक्यातल्या अपहरण केलेल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम कोरेटी यांची गोळ्या घालून नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली.