संतोष माने मनोरुग्णालयात दाखल
स्वारगेट परिसरात बेफाम एसटी चालवून आठ नागरिकांचे बळी घेणारा संतोष माने या बसचालकाला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे- स्वारगेट परिसरात बेफाम एसटी चालवून आठ नागरिकांचे बळी घेणारा संतोष माने या बसचालकाला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेचा अहवाल दोन फेब्रुवारी रोजी न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. आर. भैलुमे यांनी दिली.
गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेल्या मानेला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष मानेला याला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवावे', असे मत ससूनच्या डॉक्टरांनी दिले होते. डॉक्टरांनी दिलेले मत लक्षात घेऊन माने याला एक फेब्रुवारीपर्यंत येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जी. संतानी यांनी दिला.
या आदेशानुसार मानेला शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वास्तव्य काळातील त्याचे वर्तणूक, बोलणे, दैनंदिन हालचालींचे निरीक्षण करून त्याचा अहवाल दोन फेब्रुवारी रोजी न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. आर. भैलुमे यांनी दिली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा