पहिले पान | महाराष्ट्र | प्रज्ञा सिंहला जामीन नामंजूर

प्रज्ञा सिंहला जामीन नामंजूर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.  

प्रज्ञा सिंह हिला अधिकृतरीत्या अटक होण्यापूर्वी बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवण्यात आले होते, असा दावा तिचे वकील महेश जेठमलानी यांनी केला होता. त्यामुळे तिची जामिनावर मुक्तता केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र प्रज्ञा सिंहला बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवल्याचे बचाव पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे नमूद करत, न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी यांनी जामीन नाकारला.

कोठडीत छळ होत असल्याबाबत प्रज्ञा सिंहने मानवी हक्क आयोगापुढे सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि न्यायालयासमोर दिलेला जबाब यात विरोधाभास असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. 

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागाचा आरोप प्रज्ञा सिंहवर आहे. या स्फोटात सहा जण ठार झाले होते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0