नगरमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी
गेल्या 48 तासांत अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे दोघाजणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर- जिल्ह्यात गेल्या 48 तासांत स्वाइन फ्लूमुळे दोघाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी सुत्रांनी बुधवारी दिली. रामराव गणपत देशमुख (55 रा. शिर्डी), संगीता पवार (आष्टी) अशी मृतांची नावे आहेत.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत देशमुख यांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. तर आष्टी गावात राहणा-या संगीता पवार यांना बुधवारी सकाळी सरकारी दवाखान्यात दाखवल करण्यात आले पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा