`यू ट्युब'वर दिसंतय सुंदर माझं `कोकण'!
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी यू ट्युबसारख्या माध्यमाचा उपयोग आता मराठी चित्रपटांचे निर्मातेही करू लागले आहेत.
मुंबई- चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा ओतणे आता नवीन राहिलेले नाही. वाहिन्यांवर जाहिरातींचे स्लॉट खरेदी करण्यापासून ते होर्डिग्ज-बॅनर्सपर्यंत अनेक माध्यमे चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी वापरली जातात. मराठीत क्वचितप्रसंगी वेबसाइटही तयार केली जाते. पण, मी ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’चे दिग्दर्शक संतोष मांजरेकर आणि ‘सुंदर माझं घर’चे दिग्दर्शक दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी ‘यू टय़ूब’चा आधार घेतला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच अशा आगळ्या आणि कल्पक प्रसिद्धीतंत्राचा वापर होत असून ‘सुंदर माझं घर’मध्ये टिपलेलं निसर्गरम्य कोकण यानिमित्ताने थेट ‘यू टय़ूब’वर पोहोचले आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी आणि चित्रपटाचे प्रोमो ‘यू टय़ूब’वर उपलब्ध आहेत. ‘शिवाजीराजे..’ ला यू टय़ूबवर तीन दिवसांत पाच हजार हिट्स मिळाले आहेत. ‘सुंदर माझं घर’बाबत ‘प्रहार’शी बोलताना प्रभुलकर म्हणाले की, जगभरात इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढत चालली आहे. ‘यू टय़ूब’ आणि वेबसाईटसारख्या माध्यमातून फुकटात लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. परंतु, बहुतांश मराठी निर्माते या तंत्रज्ञानाच्या क्रांतीबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. सुदैवाने माझ्या सहवासातील लोकांमुळे इंटरनेटचे महत्व, ताकद आणि उपयुक्तता याची मला जाणीव आहे. त्यातूनच ‘सुंदर माझं घर’ची गाणी आणि प्रोमो आम्ही ‘यू टय़ूब’वर उपलब्ध केली आहेत.
चित्रपटाची कथा व कलाकारांची माहिती, छायाचित्रे, गीते www.sundarmazeghar.com या वेबसाईटवरही पाहायला मिळतात. मराठी व इंग्रजीत असणारी ही वेबसाईट बनवण्यासाठी केवळ तीस हजार रुपये खर्च आला. कोकणातील एकत्र कुटुंबात वाढलेल्या पालवी नावाच्या मुलीची, नवरा आणि त्याचे कुटुंबीय यांच्यातील दुरावा संपवून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी चाललेली धडपड, हे चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र आहे. मधुराणी गोखले, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदींनी त्यात भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला महाराष्ट्राच्या काही भागांत, तर ५ मेला मुंबईत प्रदर्शित होणार आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (17 पोस्टेड ):
konkanacha vikas jhalach pahije.
maharashtracha dhan, जणू kashmir nandavana.............
मोठ योगधन आहे I LOVE कोंकण
सतीश PEDNEKAR
परशुराम पद्स्पर्शान, लाल मातीचं झाले सोनं...कोंकण.
आज आपला पेपर ऑनलाइन बघितला फार आनंद झाला आतिशय चांगल्य प्रकारे ऑनलाइन आवृति सुर केलि करीत आपले व आपल्या टीमच हार्दिक अभिनन्दन.
city banali ki kokan nasht hoyala vel lagnar nahi.......jast develope hou naye natural ahe tasech rahu dete.........
तiरी आपला पेपर मिळेल का व त्याचा वराहर होता येणार का ?
तो वाच्काना अवावातो
माला प्रहार च्या फसबूक वर स्तेवे jobs छे फोटो विडियो टाकायचे आहेत प्लेअसे अद्विस me. और यू कैन विस्ट माय फब Ashok जाधव.ठाणे
दिवाळी अंकाची परंपरा अखंड रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील अलिशा ऍडव्हर्टायझिंग एजन्सीच्यावतीने ही स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ठ कथा, उत्कृष्ठ लेख, उत्कृष्ठ मुलाखत, उत्कृष्ठ कविता, हास्यचित्रे आणि उत्कृष्ठ मुखपृष्ठ अशा 12 प्रकारामध्ये 12 पुरस्कार स्मृतिचिन्हांच्या स्वरूपात देण्यात येईल.
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुल्या स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकाना वरील 12 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तींच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकाना सहभाग विषयक प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकामधून पुरस्कारांसाठी अंकाची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रामधले मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.
वेबसाईट (ई-दिवाळी अंक), ध्वनीफीत तसेच ध्वनीचित्रफितीच्या स्वरूपातले दिवाळी अंकही 3 मुद्रित प्रती संबंधित सामुग्रीसह पाठवून या स्पर्धेत सहभागी होवू शकतील. ई-दिवाळी अंकासाठी स्वतंत्र निकषावर पुरस्कार दिले जातील. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर परिक्षक म्हणून काम पाहतील. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या संपादक / प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या तीन (3) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअरमार्फत या संस्थेकडे बुधवार दि. 21 डिसेंबर 2011 (शेवटची तारीख) पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने “अलिशा ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज, सुदर्शन पॅलेस, प्लॉट नं. 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नोंदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर” (महाराष्ट्र) या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एजन्सीचे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनिल पाटील यांनी केले आहे.
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा