पहिले पान | मनोरंजन | मल्टिप्लेक्स

मल्टिप्लेक्स

image

प्रॉब्लेमच प्रॉब्लेम

12 December, 2010 06:35:00 AM
बाज्मी आणि शेट्टी प्रभृतींनी मात्र कथानकाला मूठमाती देऊन फक्त विनोद निर्मिती, तेही पुन्हा चुटक्यांच्या शैलीतल्या विनोदांवर भर देत विनोदी चित्रपटांची नवी परंपरा निर्माण केली आहे. अनीस बाज्मीचा ‘नो प्रॉब्लेम’ हा त्याच प्रवाहातला चित्रपट आहे. फरक इतकाच आहे की, यातले विनोद फारसे हसवत नाहीत.
image

या खेळात ‘जान’ नाही!

04 December, 2010 04:20:00 AM आशुतोषचा हा प्रयत्न पुरेसा समाधानकारक झालेला नाही. थ्रिलरमध्ये पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद हवी. त्यात आशुतोष पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. चित्रपट तुकडय़ातुकडय़ात परिणामकारक झालाय. उत्तरार्ध जबरदस्त आहे, पण कमकुवत पूर्वार्धामुळे चित्रपटाचा एकसंध परिणाम जितका तडाखेबंद असायला हवा होता, तितका तो होत नाही. ...
आणखी वाचा
image

बालगुन्हेगारीचं बालिश चित्रण

28 November, 2010 04:45:00 AM मुंबईतल्या झोपडपट्टय़ांमध्ये गुन्हेगारी वातावरणात फुलणारी बालगुन्हेगारी, या बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी सरकारने निर्माण केलेल्या रिमांड होममध्ये त्यांच्यावर होणारे गुन्हेगारीचेच संस्कार यातून अत्यंत वास्तववादी, परिणामकारक आणि तडाखेबंद चित्रपट निर्माण होऊ शकला असता. पण लेखक-दिग्दर्शकाचा मर्यादित वकुब आणि फिल्मी एलिमेंट्सकडे असलेला त्याचा ओढा यामुळे ‘अल्ला के बंदे’ पुरता फसला आहे....
आणखी वाचा
image

ब्रेक के बाद- सब गडबड

28 November, 2010 04:50:00 AM वास्तवापासून शेकडो मैल लांब असलेलं, अतिउच्चभ्रू वर्गातल्या तरुण-तरुणींचं विश्व. सामान्य माणसाला भेडसावणारे प्रश्न त्यांच्यासमोर नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोरच्या समस्याही त्यांच्या या विश्वाप्रमाणेच सुपरफिशियल आहेत. ‘रॉम-कॉम’ किंवा ‘पॉपकॉर्न फेअर’ म्हणून प्रस्थापित झालेले हे सिनेमे डोक्याचा पार गोविंदा करतात. ‘ब्रेक के बाद’ही त्याला अपवाद नाही. ...
आणखी वाचा
image

चित्रकार भन्साळीची तरल कविता-गुजारिश

21 November, 2010 08:30:00 AM ‘गुजारिश’मध्ये भन्साळी दोन गोष्टी करतो.. एक म्हणजे अत्यंत मेलोड्रॅमॅटिक होऊ शकणा-या विषयाला तो कमालीच्या संयतपणे सादर करतो. ‘ब्लॅक’ किंवा ‘देवदास’प्रमाणे तो लाऊड, बटबटीत करत नाही. दुसरं म्हणजे इतक्या गंभीर विषयातही भन्साळीने अनेक ठिकाणी मस्त ह्युमर पेरला आहे. या दोन गोष्टींमुळे ‘गुजारिश’ अंगावर येत नाही, प्रेक्षकांना गुदमरायला होत नाही. ...
आणखी वाचा
image

..आकाश उजळले होते!

14 November, 2010 08:30:00 AM 'मी सिंधुताई सपकाळ या 'चित्रपटातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण जो आत्महत्येच्या प्रयत्नाचा आणि तिथून अखेरच्या क्षणी मागे फिरण्याचा, तोही अगदी सपक पद्धतीने दिग्दर्शकाने मांडला आहे. मात्र, इतक्या सगळ्या त्रुटी असूनही दोन गोष्टींमुळे हा चित्रपट पूर्ण गाळात जाण्यापासून वाचतो. किंबहुना अन्य मराठी चित्रपटांपेक्षा काहीसा उजवाच ठरतो. एक म्हणजे दिग्दर्शकाचा हेतू प्रामाणिक आहे, दु:ख आणि संघर्षाचं भांडवल करून मेलोड्रामा सादर करण्यात त्याला रस नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अभिनयाची बाजू इतकी भक्कम आहे...
आणखी वाचा
image

विनोदाचा हुकमी एक्का

06 November, 2010 09:20:00 AM आपण काहीतरी ग्रेट, वैचारिक देतोय, असा ‘गोलमाल’च्या टीमचा आव नसतो. त्यामुळे तशा सिनेमाला लावायचे निकष लावून ‘गोलमाल’चं मूल्यमापन करण्यात फारसा अर्थ नसतो. मनोरंजनाची दिलेली 100 टक्के गॅरंटी ही चित्रपटमालिका पूर्ण करतेय की नाही, इतकंच पाहायचं असतं. सुदैवाने पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिस-या भागातही प्रेक्षकाला सतत हसवत ठेवण्यात गोलमालची टीम यशस्वी झाली आहे. ...
आणखी वाचा
image

रेट्रोची धमाल

06 November, 2010 09:55:00 AM 1970-80च्या दशकातील व्यक्तिरेखा उभ्या करून त्या काळातला सिनेमा प्रेक्षकांसमोर पुन्हा पेश करण्याची यशस्वी खेळी फरहा खानने ‘ओम शांती ओम’मधून केली. आता दिग्दर्शक विपुल शाहने अख्खाच्या अख्खा सिनेमाच त्या 70च्या दशकात नेला आहे. ‘अ‍ॅक्शन रिप्ले’चे कथानकाचा जीव लहान आहे, पण विनोदाची चरचरीत फोडणी आहे, अक्षयकुमार आणि ऐश्वर्या रायची बेहतरीन अदाकारी आहे, प्रीतमची वेगवान गाणी आहेत. परिणाम : दिवाळीच्या उत्सवी वातावरणात प्रेक्षकांना हवं असणारं एक फुल्टू टाइमपास मनोरंजन....
आणखी वाचा
image

‘मामि’चे मानकरी

31 October, 2010 09:20:00 AM महोत्सवातले सगळेच चित्रपट फार ग्रेट असतात, अशातला भाग नाही. जगातल्या अनेक देशांत चित्रपटनिर्मितीचं तंत्र अजूनही बाळबोध आहे. त्यात फारशी व्यावसायिक सफाई नाही. पण या चित्रपटांमधूनही जे विषय पाहायला मिळतात, ते थक्क करणारे असतात. मुख्य म्हणजे हे चित्रपट त्या त्या देशातली, तिथल्या समाजातली परिस्थिती, त्यांचं दैनंदिन आयुष्य, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचा परिसर यातून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची नैसर्गिकता, स्वाभाविकता असते. ‘मामि’तही अशाच काही चित्रपटांनी आपली मुद्रा उमटवली. त्याचा चिंतामणी भिडे यांनी घेतलेला आढावा....
आणखी वाचा
image

‘विकृत’चरित्र

24 October, 2010 07:40:00 AM रामगोपाल वर्माच्या अलीकडच्या चित्रपटांमध्ये असणारे सगळे दोष ‘रक्तचरित्र’मध्येही पुरेपूर मौजूद आहेत, तरीही त्याच्या अन्य चित्रपटांपेक्षा हा चित्रपट एक पायरी वरचा ठरतो, याचं कारण काही काही प्रसंगांमध्ये दिसणारा रामूचा ब्रिलियन्स आणि या चित्रपटाला असलेलं वास्तवतेचं परिमाण....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 223 | displaying: 101 - 110
मोस्ट कमेंटेड