मल्टिप्लेक्स
`भाई', आम्हाला वाचवा
17 April, 2011 04:30:00 AM
गडबड अशी आहे की, कथेचा प्रवास असाच असला तरी यातल्या सिच्युएशन्स विनोदी न होता बालिश झाल्या आहेत. प्रत्येक प्रसंगात हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यापलीकडे कुठल्याच कलाकाराच्या हाती काहीही नाही. कारण लिखित प्रसंगांमध्येच काही दम नाही.
थँक्यू- एक सॅच्युरेशनल कॉमेडी
10 April, 2011 10:30:00 AM आपल्या बायकांना सोडून बाहेर तोंड मारत फिरणारे नवरे, त्यातून उद्भवणारा संशयाचा फेरा, लपवाछपवीचा खेळ हा मसाला म्हणजे हास्यस्फोटक विनोदाची गॅरंटी. दिग्दर्शक अनीस बाज्मीने सहा वर्षापूर्वी हाच मसाला वापरून पेश केलेली ‘नो एण्ट्री’ नावाची डिश लजीज असल्यामुळे प्रेक्षकांनी ओरपून ओरपून खाल्ली होती. ‘थँक यू’मध्येही हाच मसाला आहे, पण बात कुछ जमी नाही!...चुकलेल्या चालींचा `गेम'
03 April, 2011 04:30:00 AM कागदावर अतिशय रोमहर्षक वाटणा-या या कथानकाचं पटकथेत रुपांतर होताना (कथा-पटकथा : अॅल्थी डेमास कौशल) सगळी गंमत निघून गेली आहे. पूर्वाधात चित्रपट ब-यापैकी पकड घेतो. घटना एकामागोमाग एक घडत जातात. रहस्य-तणाव यांची बांधणी चांगल्याप्रकारे होते. व्यक्तिरेखांची थोडक्यात पार्श्वभूमी देत कथानक पटापट उलगडत दिग्दर्शकाने चित्रपट वेगवान ठेवला आहे. त्यामुळेच मध्यांतराच्या टप्प्यावर कथानकाच्या पुढच्या प्रवासाविषयी उत्सुकता निर्माण होते. पण उत्तरार्धात मात्र या ‘गेम’मधल्या चाली चुकत जातात आणि चित्रपट पूर्ण घसरतो. ...फुल्ली फाल्तू
03 April, 2011 04:30:00 AM इतका अतर्क्य चित्रपट गेल्या अनेक वर्षात बघण्यात आलेला नाही. तर्काला खुंटीवर टांगून ठेवणारे दिग्दर्शक आपल्याकडे कमी नाहीत. डेव्हिड धवन, अनीस बाज्मी यांचे चित्रपटही तर्काला फाटा देणारे असले तरी ते किमान मनोरंजन तरी करायचे किंवा करतात आणि म्हणूनच प्रेक्षकांना आपला अपमान होतोय, असं कधी वाटलं नाही. ‘फाल्तू’ मात्र सगळ्या मर्यादा ओलांडतो. ...कॉपीचा ‘डाव’
27 March, 2011 06:30:00 AM सस्पेन्स थ्रिलरचे काही नियम आहेत आणि या नियमांत अपवाद करताच येत नाहीत. पटकथेची बांधणी अत्यंत घट्ट असायला हवी. प्रेक्षकाला एक क्षणही इकडे-तिकडे बघण्याची संधी मिळता कामा नये. संशयाची सुई सतत फिरती असायला हवी. पटकथेत नियमित अंतराने धक्के आणि अनपेक्षित वळणं यायला हवीत आणि संकलन अतिशय काटेकोर असायला हवं. दुर्दैवाने यापैकी एकाही नियमाचं पालन ‘दोन घडीचा डाव’मध्ये झालेलं नाही. ...वरातीची मजा, लग्नाची सजा
27 February, 2011 02:20:00 AM भन्नाट चाललेली वन डे मॅच आहे. पहिल्या 50 षटकांत मॅच तुफान रंगलीये.. दोन्ही संघ तुल्यबळ ठरताहेत आणि लंच ब्रेकनंतर मात्र सामना कमालीचा नीरस व्हावा, तशी गत ‘तनू वेड्स मनू’ची झाली आहे...विशालला एक फिल्म माँफ
20 February, 2011 05:30:00 AM रस्किन बाँड यांच्या ‘सुझानाज सेव्हन हसबंड’ या लघुकथेवर आधारित ‘सात खून माँफ’ विशालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोडत नाही. ‘मकबूल’, ‘ओमकारा’ किंवा ‘कमीने’इतका तो ग्रेट नाही. पण अखेरीस तो विशालचा चित्रपट आहे, त्यामुळे ठरवूनही तो फारसा वाईट चित्रपट बनवू शकत नाही. विशालच्या चित्रपटांत आढळणारी सर्व वैशिष्टय़े याही चित्रपटात आढळून येतात. ...या ‘जिंदगी’चा भरोसा नाय!
06 February, 2011 09:00:00 AM ‘ये साली जिंदगी’ या नावात जो अॅटिटय़ूड आहे, जी बेदरकारी आहे, जो हताशपणा आहे, जी व्यर्थपणाची भावना आहे ती लक्षात घेता या नावाच्या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा अंदाज बांधता येऊ शकतो. सुदैवाने हा अंदाज बांधून चित्रपट बघायला बसल्यानंतर तो क्षणभरही निराश करत नाही. ...दिल तो `अच्छा' है जी...
30 January, 2011 05:30:00 AM स्लॅपस्टिक्सचा सोपा मार्ग स्वीकारत बिनडोक कॉमेडी प्रेक्षकांच्या माथी मारण्याची पद्धत रूढ झाली असताना मधुरने आपल्या या पहिल्याच विनोदी चित्रपटात प्रसंगनिष्ठ विनोदासारखा तुलनेने अवघड मार्ग पत्करला आहे. यातला विनोद पोट दुखेस्तोवर हसवणारा नाही, यात चमकदार वन लाइनर्स नाहीत. पण पहिल्या प्रसंगापासून तुमच्या चेह-यावर कायम हसू फुललेलं राहील, याची काळजी हा सिनेमा घेतो....मन्या, द `ब्लंडर' बॉय
30 January, 2011 05:30:00 AM चित्रपट भरकटण्यासाठी पटकथाकार आणि दिग्दर्शक दोघेही सारखेच जबाबदार आहेत आणि संकलक तर उत्तरार्धात पूर्ण झोपी गेलाय. चित्रपट परिणामकारक करणारे हे तीन घटकच कमकुवत पडल्याने स्वाभाविकपणे चित्रपटावर परिणाम होणारच. ...मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य