पहिले पान | मनोरंजन | नाट्यपट | पुन्हा पुरुष!

पुन्हा पुरुष!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

‘अस्मी प्रॉडक्शन’चं तिसरं पुष्प, जयवंत दळवी यांचं ‘पुरुष’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या सुवर्णकाळात नाटय़ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नाटकं नव्या रूपात, नव्या संचात करण्याचा ट्रेंड सुनील बर्वे यांच्या हर्बेरियमने आणल्यानंतर नीलम शिर्के यांनीही पन्नास जुनी नाटकं रंगभूमीवर आणण्याची घोषणा केली होती. त्यांच्या अस्मी प्रॉडक्शनने बॅरिस्टरआणि मोरुची मावशीही दोन नाटकं आणून त्याची सुरूवात केली होती. आता अस्मी प्रॉडक्शनचं तिसरं पुष्प, जयवंत दळवी यांचं पुरुषहे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

या नव्या पुरुषचं मोहन जोशी करणार असून ते गुलाबरावची व्यक्तिरेखाही साकारणार आहेत. अंबिकाच्या भूमिकेत श्रृता प्रभूदेसाई, आईच्या भूमिकेत ज्योती चांदेकर, तर मथुराच्या भूमिकेत रसिका धामणकर आहेत. मयूर खांडके आणि रामकृष्ण गाडगीळ अनुक्रमे सिद्धार्थ आणि बाबांची भूमिका साकारत आहेत. बाबा धुरी यांचं संगीत असून नेपथ्य बाबा पार्सेकर यांचं आहे. महेंद्र भांबिड यांनी प्रकाशयोजना केली आहे.

 

या नाटकाचे केवळ पंचवीस प्रयोग होणार असून शुभारंभाचा प्रयोग 18 फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ नाटय़गृहात होणार आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0