PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नाट्यपट अ‘चॅट’ कॉमेडी ================================================================================ अरुण घाडीगावकर on 06 May, 2012 07:10:00 AM ‘अहो! राहू द्या नं घरी!’ या नाटकाची मध्यवर्ती कल्पना पती-पत्नीच्या ‘नात्या’वर आधारित आहे. निर्माते दिलीप जाधव यांनी आपल्या ‘अष्टविनायक’ या संस्थेद्वारा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलं आहे. राजेश देशपांडे यांनी या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. ‘सुयोग’ची ‘सरगम’ ================================================================================ प्रहार on 08 April, 2012 06:50:00 AM 'सुयोग’ ही सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांची नाट्यसंस्था ठराविक काळाने एखादं नवं चमकदार नाटक रगंभूमीवर आणत असते. यशवंतराव चव्हाण यांच्यावर महानाट्य ================================================================================ प्रहार on 08 April, 2012 04:45:00 AM जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने यशंवतराव चव्हाण यांच्या देदीप्यमान आणि भव्य कारकीर्दीचं समग्र दर्शन घडवणारी कलाकृती सादर करण्याची जबाबदारी ‘मराठी बाणा’, ‘आवाज की दुनिया’, ‘आझादी पचास’सारखे भव्यदिव्य कार्यक्रम देणारे अशोक हांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कमरेखालच्या विनोदात अडकलेला ‘घो’ ================================================================================ अरुण घाडीगावकर on 01 April, 2012 07:30:00 AM अश्लीलतेच्या जवळपास जाणारे पांचट विनोद आणि त्याचबरोबर बाबल्यानं ‘घाण वारा सारून’ गणपतमामाला हैराण करणं.. या विनोदाची पातळी कोणती? त्या नसत्या विनोदाला दाद देणा-या प्रेक्षकांची बौद्धिक पात्रता काय? श्रद्धा आणि बुद्धिवादाचा झगडा ================================================================================ अरुण घाडीगावकर on 18 March, 2012 04:30:00 AM ईश्वरी कोपामुळे कुण्या मानवाचं नुकसान झालं, तर त्याची दाद कुठं मागायची? देवानंच जर अन्याय केला, गुन्हा केला तर न्याय कुठे मिळणार? गुन्हेगाराला शिक्षा कशी होणार? देवाच्या अवकृपेमुळे देशोधडीला लागलेल्या व्यक्तीनं करायचं काय? हेच प्रश्न, ‘सुयोग’निर्मित ‘केशवा-माधवा’ या नाटय़कृतीतील केशव पडळशिंगीकर हा नायक विचारतो. सत्तास्पर्धेचं राजकारण ================================================================================ अरुण घाडीगावकर on 11 March, 2012 08:05:00 AM राजकारणासारखा रुक्ष विषय असूनही संवाद, मांडणीच्या टवटवीतपणामुळे आणि कलाकारांच्या नैसर्गिक, सहजसुंदर अभिनयानं ‘सत्ताधीश’ प्रेक्षणीय होतं. धनंजय थोरात ही मध्यवर्ती भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी सा-या बारकाव्यानिशी केली. दणकट ‘पुरुष’ ================================================================================ अरुण घाडीगावकर on 04 March, 2012 05:45:00 AM नव्यापिढीला मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्यासाठी ‘अस्मी प्रॉडक्शन’ आणि ‘कीर्ती प्रॉडक्शन’नं ही योजना आखली. या योजनेंतर्गत ‘अस्मी प्रॉडक्शन’चं तिसरं पुष्प ‘पुरुष’ व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. गिरणी संपाची परिणती ================================================================================ अरुण घाडीगावकर on 26 February, 2012 05:30:00 AM प्रभाकर लक्ष्मण मयेकर, प्रेमानंद गज्वी, दिलीप परदेशी, अरविंद विश्वनाथ, डॉ. अनिल बांदिवडेकर, डॉ. आनंद नाडकर्णी, रमेश पवार, वामन तावडे, मधुकर गोलामडे, सुधीर कवडी, अशोक पाटोळे, महेश एलकुंचवार यांच्यासारखी नाटककार मंडळी एकांकिका लिहीत होती, तेव्हा आणखी एक नाव प्रकर्षानं एकांकिका स्पर्धेत लक्षात राहायचं, ते प्रदीप राणे यांचं. पुन्हा पुरुष! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 12 February, 2012 02:30:00 AM ‘अस्मी प्रॉडक्शन’चं तिसरं पुष्प, जयवंत दळवी यांचं ‘पुरुष’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आलबेल’ नसणारी मानवी प्रवृत्ती ================================================================================ अरुण घाडीगावकर on 29 January, 2012 03:30:00 AM सई परांजपे यांनी चित्रपटात जसं वेगळेपण राखलं, तसं मराठी रंगभूमीवरही त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाडय़ांवर नवे प्रयोग यशस्वीपणे केले. सख्खे शेजारी, नांदा सौख्यभरे, जास्वंदी.. ही नाटक आजही टवटवीत वाटतात.