सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्हेंटिलेटर खरेदीसाठीच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाने नोटिसा बजावल्या आहेत.
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या भीषण जातीय दंगलींचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठच तत्कालिन भाजप सरचिटणीस नलिन भट्ट यांनाही समन्स बजावले आहे.
दी अपील ऑफ कॉन्शस फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्टेट्समन पुरस्कार 2010 सालासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे.