तारीख की मुहूर्त, कालगणनेतील एक टप्पा की आयुष्यात आपण घेऊ असा न भूतो न भविष्यती असा अनुभव..? शतकातून एकदाच येणा-या या दिवसामुळे सगळीकडेच अशा प्रश्नांची घुसळण झाली. त्यापलीकडे जाऊन हा दिवस स्मरणात राहण्यासाठी अनेकांनी लग्न, बारसे किंवा तत्सम कार्यक्रमही आखले. तर अगदी सेलिब्रेटिंनीही या मुहूर्तावर पालक होण्याचे नियोजन केल्याच्या बातम्या आल्या. हा दिवस ‘इव्हेंट’ म्हणून साजरा करण्यासाठीही मग इव्हेंट मॅनेजमेंटवाले सरसावले.. 11/11/11शी निगडीत सुरस, रंजक गोष्टींचा हा वेध..
11-11-11 या तारखेकडे फक्त अंकाची गंमत म्हणून बघायला हवे. 11 हा आकडा पुन्हापुन्हा येणे, हे या दिवसाचे किंवा तारखेचे वेगळेपण असल्याचे अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिष अभ्यासकांना वाटते....
हा आकडा महत्त्वाचा, अतिशय चांगला किंवा वाईट असे कोणतेही भाकित किंवा मत केले आणि मांडले जात नाही. मात्र, हा आकडा असा तीन वेळा सलग येत असल्यामुळेच त्यातून गणितीय सौंदर्य निर्माण होते आणि म्हणूनच त्यातून एक उत्सुकता आणि जिज्ञास मनात जागृत होते. तरीही 11/11/11 ही अकराची ‘तिकडी’ पहिल्यांदाच एकत्र येत असल्यामुळे ढोबळमानाने तीन भाकिते करता येऊ शकतात...
11-11-11 चा योगायोग जुळवून आणण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळय़ा कसरती करत असले, तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण होण्याचा योग योगायोगाने याच दिवशी जुळून आला आहे....
11/11चा योग जुळवत जन्माला आलेल्या बाळांना ‘विशेष आरोग्य कार्ड’ देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. ...