Home | अलविदा २००९

अलविदा २००९

image

वर्ष सरले.. प्रश्न उरले..

मुंबईतील २६/११च्या दहशतवादी नरसंहाराच्या सावटाखाली उगवलेले २००९ लगेच ‘इलेक्शन मोड’मध्ये गेले. या वर्षाभरात वाढती महागाई, बेरोजगारी, धार्मिक कट्टरता अशा अनेक समस्या तीव्र झाल्या. स्वाइन फ्लूची साथ, ऐला चक्रीवादळाचा तडाखा या आपत्तींनाही तोंड द्यावे लागले. ‘वर्ष सरले.. प्रश्न उरले’, हाच निष्कर्ष अधोरेखित करणारा हा त्रोटक आढावा...
Full story

कल्याण-डोंबिवलीच्या वाट्याला बदनामीच

दिवसागणिक होणा-या चो-या घरफोड्या, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात भाजप नगरसेवकाला झालेली अटक, लाचखोर पालिका उपायुक्त व महिला पोलिस उपनिरीक्षकास झालेली अटक, रेल्वे अपघात, प्रवाशांची रखडपट्टी.. सरत्या वर्षातील अशा अनेक घटनांचे सावट सोबतीला घेऊन कल्याण, डोंबिवलीचा परिसर नव्या वर्षाचे स्वागत करणार आहे. ...
Full story

कलानी, स्कायवॉक आणि बारभाईंची सत्ता

आमदारकीचा शेवटचा बुरूज ढासळल्यामुळे कलानी यांच्याकडे सध्या कुठलेही सत्ताकेंद्र राहिलेले नाही. एकेकाळी सिंधी समाजाचे मसिहा म्हणून स्वत:ला मिरवणा-या कलानी यांच्यावर अतिआत्मविश्वासामुळे आमदारकी गमावण्याची नामुष्की ओढवली. ...
Full story

भक्तांच्या पंढरीचे पावित्र्य राखले

टिटवाळा गणेश मंदिर परिसरात गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना. निर्माल्य टाकण्याची सोय नसल्याने घाणीचे साम्राज्य माजून मंदिराच्या पावित्र्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह. यावर भक्तगणांच्या भावनांचा आदर करत ‘प्रहार’ने उठवेला आवाज. त्यामुळे उशिरा का होईना, जाग आलेल्या केडीएमसीने सारवासारव करून या परिसराचे पावित्र्य राखले. ...
Full story
image

ठाणेकरांच्या मनात रुखरुख

ठाण्यात, राबोडीतील दंगल, कोपरी पुलाजवळील गर्डर लोकलवर कोसळणे, ‘पुनर्वसू’ इमारतीच्या आगीत अग्निशमन दलाच्या ६ जवानांचा मृत्यू अशा रुपेरी ढगांना काळी किनार लावणा-या घटनाही घडल्या. नववर्षात पाऊल टाकताना या दु:खद घटनांमुळे ठाणेकरांच्या मनात रुखरुख कायम राहणार आहे. ...
Full story

बँकिंग व्यवसायाचा बदलता चेहरा

सरकार, सेबी आणि रिझव्‍‌र्ह बँक ही त्रयी देशातील बँकिंग क्षेत्राच्या विकासात अडसर असल्याचा डांगोरा पिटला जात असताना, मंदी आल्यावर मात्र या त्रयींनी निर्माण केलेल्या नियमांचे अडसरच कामाला आले आणि इतर देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना आपली अर्थव्यवस्था मात्र शाबूत राहिली....
Full story
image

मागील पानावरून पुढे

मराठीसाठी हे वर्ष ख-या अर्थाने गाजवलं ते ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने. मनसेच्या आंदोलनांमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय संघर्ष ऐरणीवर आला असतानाच जणू राज ठाकरे यांचीच भाषा बोलणा-या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयाला चांगलाच हात घातला. ...
Full story
image

चंद्रयान नवी पृथ्वी आणि फसलेले अणुभंजन

चंद्रयान-१’ या चंद्राचा वेध घेणा-या भारताच्या पहिल्याच मोहिमेला आलेले घवघवीत यश भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम करायला लावणारे ठरले. भारतीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने भारतीय भूमीवरून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘चंद्रयान-१’ या यानाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर पाणी असल्याच्या शक्यतेला दुजोरा देणारे पुरावेच सादर केले. ...
Full story
image

पदरात पडलं जेमतेम यश

‘लव आज कल’, ‘न्यूयॉर्क’, ‘कमीने’, ‘वाँटेड’, ‘पा’, ‘थ्री इडियट्स’, ‘दे दना दन’, ‘ऑल द बेस्ट’ असे अक्षरश: हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच चित्रपट निर्विवाद यशस्वी ठरले. शाहरूख खानच्या ‘बिल्लू’ला जेमतेम यश मिळालं, तर ‘दिल्ली ६’, ‘व्हॉट्स युवर राशी’, ‘जेल’, ‘दिल बोले हडिप्पा’, ‘लंडन ड्रिम्स’, ‘कुर्बान’ असे अनेक महत्त्वाकांक्षी चित्रपट झोपले. वर्षाची सुरुवातच ‘चांदनी चौक टू चायना’ नामक भिकार, पडेल चित्रपटाने झाली....
Full story
image

नवी मुंबईला दुर्घटनांचे गालबोट

स्कूलबसच्या घटनेनंतर पालिका, शाळा व्यवस्थापन व आरटीओ यांनी काही महत्त्वाची पावले उचलली असली, तरी ठोस उपाययोजना अजूनही अमलात आलेली नाही. तर पालिकेच्या अतिक्रमण घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आजही बिनदिक्कत उजळ माथ्याने फिरत आहेत. सर्वसामान्यांच्या पैशांचा अपहार करणा-यांना जरब बसलेली नाही याचेच हे एक उदाहरण आहे. ...
Full story