‘साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही..’ कवीवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या या काव्य ओळींचा प्रत्यय शिवाजी पार्कवर येत होता.. क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकरांच्या ५३ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या भीमसागराकडे अरबी समुद्रही जणू कुतुहलाने पाहात होता.
‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’, अशी कृतज्ञतेची आणि अभिमानाचीही भावना उरात बाळगून दरवर्षी हजारो-लाखो लोकांचा जनसागर दादर समुद्रकिना-याजवळच्या चैत्यभूमीवर उसळतो....
तुझ्याशी चाललेला माझा सुसंवाद नाही येणार मला थांबवता त्यापुढील संप्रेषणसुद्धा शत्रूने फार नाडले आहे...
...
दरवर्षी वसा घेतल्यागत चैत्यभूमीकडे लोटणा-या जनसागराच्या निळ्या लाटांनी. गर्दीला चेहरा नसतो, असे म्हणतात. पण इथे शोधायला गेलात तर चेहरा सापडेल तो अनामिक स्वयंप्रेरणेने, अनिवार ओढीने चैत्यभूमीकडे खेचल्या जाणा-या पावलांवर किती तरी तास तिष्ठत उभ्या असणा-या कष्टकरी जनतेचा.. ...
‘जिना, गांधी झोपले, समाज आहे त्यांचा हो जागा! समाज आहे माझा झोपलेला, मी आंबेडकर झोपू कसा सांगा!’ एका कविमनाने मांडलेल्या याच अस्वस्थेतून गेलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी पिढ्यानपिढ्या अंध:कार आणि गुलामगिरीच्या गर्तेत लोटलेल्या दलित, शोषित, पीडित समाजासाठी ज्ञानमंदिराची कवाडे खुली करून दिली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पुस्तक एक अशिक्षित स्त्री उलटं पकडते आणि विक्रेत्याला विचारते, ‘‘दादा, हे पुस्तक केवढ्याला?’’ तिनं पुस्तक उलट पकडल्याचं पाहून विक्रेता अचंबित नजरेने पाहतो. पण बाबासाहेबांचा फोटो उलटा पकडल्याचं लक्षात येताच ती पुस्तक सरळ करून तोच प्रश्न पुन्हा विचारते.. ...