शिवसेना सोडल्यानंतर बराच काळ हे नेते भीतीच्या छायेत वावरत असल्याचे अनेकांनी पाहिले. अपवाद होता तो फक्त नारायण राणे यांचा. राणे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला तोही शिवसेना स्टाईलनेच. शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, हे आधीच हेरलेले राणे ‘दोन घेईन तर चार देईन’ या पद्धतीनेच शिवसेनेच्या असंतोषाला सामोरे गेले.
घेतलेला कोणताही निर्णय आणि दिलेला कोणताही शब्द पाळण्याचा राणे यांचा स्वभाव सर्वपरिचित आहे. त्याचबरोबर घेतलेल्या निर्णयाची त्वरित अमलबलावणी करण्याची तत्परता त्यांच्यामध्ये आहे....
राज्याचा विकास, जनसामान्यांचे कल्याण आणि त्यासाठी सक्षम प्रशासन देण्याची कुवत ही राणे यांची गुणवैशिष्टय़े तर आहेतच, त्यांना कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परता या गुणांचीही जोड आहे. त्यामुळेच त्यांच्या नावामागे ‘लोकनेता’ हे नामाभिधान आपोआप जोडले गेले....
कोणतेही काम तात्काळ मार्गी लावण्याच्या धाडसी स्वभावामुळे राणे कोणत्याही पदाला योग्य न्याय देतात. राज्याच्या विकासासाठी काम करण्याची तळमळ त्यांच्या दूरदृष्टीतून दिसून येते.....
सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कार्यरत असणारा व संघर्षातही आत्मविश्वासाने लढणारा नेता, असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व राणे यांचे आहे..
...
मुख्यमंत्री म्हणून राणे यांना फारच कमी संधी मिळाली, परंतु जो काही कालखंड मिळाला, त्यात त्यांनी इतक्या प्रभावीपणे काम केले की, प्रशासकीय अधिकारी अजूनही त्यांचे नाव काढतात....
राजकारणात उच्च पदावर राहून राजकारणविरहित संबंध जोपासणारे अशी राणे यांची खास ओळख आहे. त्यामुळेच अनेकांना हवेहवेसे वाटणारे असे त्यांचे नेतृत्व आहे....
आमदार म्हणून विधिमंडळात कसे काम करावे आणि मंत्री झाल्यानंतर कार्यशैली कशी असावी, हे राणेंकडूनच शिकावे. प्रशासन उत्तमरीत्या हाकतानाच पक्ष कार्यकर्त्यांशी उत्तम समन्वय राखणारे राणे हे एकमेव नेते असावेत....
राजकारणातील वैचारिक संघर्षाचा वैयक्तिक जीवनावर राणे कधी परिणाम होऊ देत नाहीत. राजकारणापलीकडचे नाते जपणा-या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.....
आपल्यावर प्रेम करणा-यांसाठी टोकाला जाऊन मदत करणारा नेता म्हणजे राणे साहेब.. प्रशासनात उत्तम पकड असलेला हा नेता दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यांची जनहिताची तळमळ तर अवर्णनीयच!...