रिमोट कंट्रोलच्या शोधामुळे टीव्हीला स्पर्श न करताही त्याची बटनं वापरता येणं शक्य झालं. शिवाय प्रेक्षकांना न आवडणारे कार्यक्रम पाहण्याची सक्तीही उरली नाही. तसंच जाहिराती झळकत असतात तेव्हा चॅनेल बदलणं किंवा त्याचा आवाज म्युट म्हणजे गप्प करणंही शक्य झालं. रिमोट आल्यामुळे टीव्ही चॅनेलना आपल्या कार्यक्रमांच्या स्वरूपात बदल करावे लागले. कारण प्रेक्षकांना कार्यक्रम पसंत पडला नाही तर ते दुस-या कार्यक्रमाकडे वळू लागले तसंच कार्यक्रमादरम्यान जाहिरातींची संख्या जास्त ठेवल्यास प्रेक्षक चॅनेल बदलण्याचीही भीती त्यांना वाटू लागली.
एकदा एक सिंह त्याच्या राज्यातून म्हणजे जंगलातून फिरत होता. फिरता फिरता कसा कोण जाणे, तो एका पारध्यानं लावलेल्या जाळ्यात अडकला. त्यातून बाहेर पडण्याची तो धडपड करू लागला. पण तसतसा तो अधिकच जाळ्यात अडकू लागला. ...
रोएतगेनच्या शोधाची कीर्ती अल्पावधीतच जगभर पसरली. या शोधानं वैद्यकीय जगात क्रांती घडवली. कारण त्यापूर्वी माणसाच्या शरीरात नेमकं काय बिघडलंय, रुग्णाला कुठे दुखतंय, हे विचारून (मॅनिपुलेशन), छातीची धडधड ऐकून (ऑस्कलेशन) आणि अवयव किती तंदुरुस्त आहेत, हे कळण्यासाठी त्यावर हलकेच मारून बघणं (पर्कसन), या तीनच गोष्टींवरून जाणून घेतलं जाई. रोंटजनचं एक्से रे फोटोग्राफीचा शोध वैद्यकीय निदानाच्या बाबतीत एक मोठी झेप ठरली....
पशू-पक्ष्यांमधली ही लढाई खूप वर्षे चालू होती. जेव्हा पशूंचा विजय होत असे. तेव्हा ते जंगी आनंदोत्सव साजरा करत. सर्व जंगल दणाणून टाकत. मोठमोठ्या मिरवणुका, सनई-चौघडे वाजवत. तेव्हा वटवाघूळ त्यांच्यामध्ये मिसळून मोठमोठ्यानं विजयाच्या घोषणा देई. सनई-चौघडे वाजवी. जणू काही त्याचाच विजय झाला आहे....
कार्बन पेपरचा शोध नेमका कधी लागला हे अज्ञात आहे, परंतु ‘काबरेनेटेड पेपर’चा वापर पहिल्यांदा 1908 मध्ये झाल्याची नोंद आहे. राल्फ वेडवुड या इंग्रजानं ‘स्टायलोग्राफिक रायटर’ या यंत्राचं पेटंट या वर्षी नोंदवलं. पण याच सुमारास पेलेग्रिनो तुरीनं टाइपरायटरचा मशिनचा शोध लावला होता आणि मशिनसाठी ‘ब्लॅक पेपर’ ही गरजेची गोष्ट होती. वेडवुडनं ‘काबरेनेटेड पेपर’चा शोध लावला असावा त्याच सुमारास तुरीनं ब्लॅक पेपरचा शोध लावला होता. विशेष म्हणजे, दोघांचाही हेतू सारखाच होता. दोघंही अंध व्यक्तींना मशिनच्या मदतीने लिहिता यावं, म्हणून प्रयत्न करत होते आणि ब्लॅक पेपर हा शाईसाठी पर्याय होता....
शेवटी तळ्यातल्या सर्व बेडकांची सभा घ्यायची ठरलं. या सभेत तळ्यामध्ये सर्वानी आनंदानं, गुण्यागोविंदानं राहावं, यावर बरीच चर्चा झाली. पण आजवरच्या अनुभवावरून असं नुसतं ठरवून काही होणार नाही. तेव्हा सर्वावर धाक राहिल, असा एक राजा हवा, असं ठरलं.
...
चिलटानं थकून हार मानली. तसा कोळी त्याच्या दिशेनं येऊ लागला. चिलटाला आपलं मरण दिसू लागलं. तसं ते स्वत:शीच म्हणालं, ‘आपण एका बलाढ्य सिंहाला, जंगलाच्या राजाला हरवलं, पण एका छोट्याशा कोळ्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. दुर्दैव म्हणायचं आपलं, दुसरं काय?’
...
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेच्या हेन्री सिली याच्या लक्षात आलं की, इस्त्रीचा लोखंडी तळभाग तापवण्याचा आणखी काही मार्ग असू शकतो. म्हणजे इस्त्री विजेचा वापर करून तापवली तर? 1882 मध्ये सिलीनं आपल्या कल्पनेला मूर्त रूप दिलं. त्यानं जगातली पहिली इलेक्ट्रिक इस्त्री बनवली. विशेष म्हणजे तेव्हा अमेरिकेत विजेची निर्मिती होतच नव्हती. सिलीने इलेक्ट्रिक इस्त्रीचा शोध लावल्यावर तीन महिन्यांनी अमेरिकेत वीजनिर्मितीला सुरुवात झाली. त्यामुळे सिलीनं काळाच्याही पुढे जाणारा शोध लावला होता....
गंमत म्हणजे, ‘बँड एड’ हे एक ब्रँडनेम आहे. या प्रकारच्या पट्टीला खरं तर स्टिकिंग प्लास्टर म्हणतात. जखमेच्या ठिकाणी चिकटेल अशी औषधी पट्टी पहिल्यांदा बनली 1921 मध्ये. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या कंपनीनं ‘जॉन्सन अँड जॉन्सन अधेसिव्ह बँडेज’ या नावानं ती या कंपनीचा एक कर्मचारी अर्ले डिकिन्सन यानं तयार केली.
...
मालुसरे यांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हे दीर्घकाव्य लिहावंसं वाटलं असावं. शिवाजी महाराजांचं आयुष्यही तसं पोवाडे, कविता, गाणी यांची निर्मिती होण्यासारखंच आहे. पण ते मुलांसाठी लिहिताना अनेक गोष्टींचं व्यवधान सांभाळावं लागतं.
...