अमेरिकेशी व्यापाराच्या संधी उपलब्ध झाल्याने चीनमध्ये पैशाचा ओघ वाढू लागला. अमेरिकी सरकार आणि लोकांना खुश करण्यासाठी चिनी लोकांनी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली आहे. अस्सल चिनी भाषेशिवाय कुठलीच भाषा न येणा-या चीनमध्ये आता हॅलो, प्लीज, थँक यू, होल्ड ऑन, वेट हे इंग्रजी शब्द कानी पडू लागले आहेत. चिनी खाद्यसंस्कृतीच्या बाहेरचा एकही पदार्थ माहीत नसतो.
एक ऑक्टोबर 1949 रोजी चीननं ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ या नावानं स्वायत्त प्रजासत्ताकाची स्थापना केली. चीनच्या प्रजासत्ताकासाठी संघर्ष स्वकियांशीच होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सर्वात मोठय़ा अराजकाला चीन सामोरं जात होता. 1900चे प्रसिद्ध बॉक्सर बंड, मांचू राजवटीचा पाडाव करण्यासाठी झालेले अनेक संघर्ष, युद्ध, या दरम्यानच रशियाचे चीनच्या उत्तरेस असणा-या मांचू प्रांतावरील आक्रमण, जपानशी लढाई या परिस्थितीत संक्रमणकाळातूनजाणारा चीन. या अराजक परिस्थितीतच 1911 मध्ये पहिली राज्यक्रांती चीनमध्ये झाली. ...
प्रत्येक चिनी माणूस जेवण क्यायझ/चॉपस्टिकनेच हळूहळू खातो. चिनी माणसांचं जेवण चालू असतानाच सिगारेटचे झुरके चालू असतात. जेवण संपेपर्यंत किमान तीन सिगारेट कधी फस्त झाल्या ते कळतही नाही. आपल्याकडे जेवण झाल्यावर सिगारेट पिणारी माणसं आढळतात. मात्र, चिनी लोक खूपच सिगारेटप्रेमी असल्यामुळे कुठल्याही वेळी सिगारेट पिणं हा त्यांचा आवडता छंद. ब्रिटिश आणि चिनी लोकांची तीन अफूंची युद्धं का झाली असावीत, याचा अंदाज चिनी लोकांच्या सिगारेटप्रेमावरून सहज येतो. ...
चिनी लोकांनी इंग्रजीचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्हुई प्रांतात उभारलेल्या अत्याधुनिक तंत्र-मंत्रांनी युक्त ‘स्पीच टेक्नॉलॉजी डाटा बँके’ला आज आम्ही भेट दिली. यूएसटीसी विद्यापीठाच्या भाषाविषयक विभागाने 1990 मध्ये या तंत्रज्ञानावर काम सुरू केले. त्यासाठी ‘आय फ्लाय टेक’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. या कंपनीमार्फत भाषाविषयक प्रशिक्षण, व्यवसायाला आवश्यक असणा-या कॉल सेंटरमधल्या कर्मचा-यांना इंग्रजीचं शिक्षण आणि सॉफ्टवेअर निर्मितीचं काम ही कंपनी करते. या संस्थेने चिनी लेखन योग्य उच्चारांसह वाचणारं उपकरण तयार केलं. त्यातच चिनी ते इंग्रजी अनुवादाची सोयही केली. ...
आपल्या विद्यापीठाप्रमाणेच कार्यालय, वर्गखोल्या, वसतिगृहे आणि घनदाट नवराई, असे चित्र होते. मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसून आली. विद्यार्थ्यांचे पेहराव चिनी पोषाखापेक्षा अमेरिकन संस्कृतीशी सलगी करणारे दिसत होते. आधुनिकतेचं वारं अमेरिकेहून चीनच्या सर्वच क्षेत्रात पसरलेलं आहे. विद्यापीठचं वातावरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांनी नव्या पिढीस शिक्षणाचे धडे देताना फुलून दिसत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण जगाच्या स्पर्धेत किती मागे आहोत, हे पदोपदी जाणवत होते. आमच्या अभ्यास दौ-यात चिनी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद हा दोन देशांच्या युवा पिढीला एकत्र आणण्यासाठी एक छोटंसं पाऊल आहे....
शांघायमधला आज आमचा शेवटचा दिवस. आम्ही सर्व जण सामानाचं पॅकिंग करूनच हॉटेलबाहेर पडलो. चार दिवसांपासून शांघायचा असा लळा लागला की, इथून जाऊ नये, असं वाटू लागलं. शांघाय ही कलियुगातील आधुनिक मयसभा आहे. चिनी लोकांच्या कल्पकतेनं आणि मेहनतीनं उभं केलेलं पूर्वेचं भूषण आहे. आम्ही चार दिवसांत फक्त पाच प्रमुख स्थळांना भेट देऊ शकलो. मात्र आजही पाहता येऊ शकणारी अशी अनेक स्थळं आहेत. त्यांना आवर्जून पाहण्यासाठी शांघायला पुन्हा पुन्हा यावं लागेल, याची खूणगाठ मनाशी बांधली. या दौ-याच्या निमित्तानं शांघाय शहराचं बाह्यरूप जवळून अनुभवता आलं. रस्ते, इमारती, व्यापारासाठी आवश्यक असणारं जगातील सर्वात मोठं बंदर. जगाच्या कोणत्याही शहराच्या तोडीस तोड अशा सुविधा आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौंदर्यात भर घालणारी दृष्टी हेच शांघायचं भूषण. ...
लो. एका गल्लीतून दुस-या गल्लीत असा प्रवास करत दहा मिनिटांत ‘कॅफे कॉफी डे’ (सीसीडी) दिसलं. आम्हा सर्वासाठी कॅपुचिनो देण्याची विनंती केली. न राहवून अमित पाटलांनी काम करणा-या बाईला, ‘तुमच्या देशात चहा-कॉफी का सहज मिळत नाही?’ असं इंग्रजीत विचारलं. तिला काहीच समजलं नसावं. तिनं चेह-याच्या हावभावांनी आश्चर्य व्यक्त करून युकी नावाच्या मदतनीस युवतीला बोलावलं. तिला थोडीफार इंग्रजी समजत होती....
शिक्षण आणि माहितीच्या तिस-या दालनात नालंदा विद्यापीठानं ‘एज्युसॅट’ या उपग्रहामार्फत संपूर्ण देशाला तंत्रज्ञानाने जोडलं आहे, हे आपण शैक्षणिक जगाला ओरडून सांगत आहोत. आर्यभट्टाच्या शून्यापासून कल्पना चावलाच्या भारताच्या शास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आलेख चौथ्या दालतान जिवंत करण्यात आला. पाचवं दालन हे भारतीय लोकशाही आणि शासन पद्धतीविषयी होते. त्यात आर्य चाणक्य, सम्राट अकबर, सम्राट अशोकांच्या कारकीर्दीचा आढावा होता. तर भारत सरकार नरेगा आणि भारत निर्माणाच्या योजना कशी राबवते, हे दाखवण्यात आलं होतं...
विमानतळावरच गप्पांची मैफल रंगू लागली. प्रत्येकाचा चीन दौ-याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे? चिनी लोकांबद्दल काय मत आहे, हे जाणून घेताना चीनविषयीचं कुतूहल वाढल....
जगात कोठेही गेलो, तरी संवादाचे साधन असते ती म्हणजे भाषा. चीनला जाताना यक्षप्रश्न भाषेचा आहे. त्यामुळे अभ्यास-दौ-यात पाच चिनी भाषा-अभ्यासकांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील जेएनयूमधील चिनी भाषा अभ्यासक प्रभातकुमारने आम्हास चिनी भाषेविषयी काही अज्ञात नव्हे तर अद्भुत तथ्ये सांगितली. जगात उच्चारांवरून चित्रलिपीत लिहिली जाणारी आणि अर्थ लावणारी चायनीज ही एकमेव भाषा....