Home | संपादकीय

संपादकीय

अण्णांचे सीमोल्लंघन

अण्णा हजारे ताकाला जाऊन भांडे लपवणारे नाहीत. जनलोकपाल विधेयक आणण्याची इच्छा नसलेल्या काँग्रेसला मतच न देण्याचे थेट आवाहन त्यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मतदारांना केले आहे.
Full story

स्वप्नांची घरघर

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा असल्या तरी त्यातील तिसरी- म्हणजे घर- हे गरजेपेक्षाही ‘स्वप्न’ मानले जाते. ते स्वप्नवत राहू नये, याची काळजी सत्ताधा-यांनी घ्यावी, अशी अपेक्षा असते. ...
Full story

जैतापूर अणुप्रकल्प अधिक भक्कम!

जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून मध्यम तीव्रतेच्या भागामध्ये येत असला, तरी या प्रकल्पाची उभारणी करताना अपेक्षेपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकेल, याचा विचार करण्यात येणार आहे. ...
Full story

इजिप्त जात्यात; अरब राष्ट्रे सुपात

टय़ुनिशियापाठोपाठ इजिप्तमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध उठाव झाला तेव्हाच आंदोलनाचे हे लोण शेजारच्या बहारिन, येमेन, जॉर्डन, लिबिया, मोरक्को, अल्जिरिया याही देशात पसरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तो एवढय़ा लवकर खरा ठरेल, असे वाटत नव्हते. इजिप्तमधल्या उठावाला आठवडा उलटत नाही तोच आता बहारिन, येमेन आणि लिबियातली जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. इजिप्तच्या तहरीर चौकात सुरू झालेले हे आंदोलन आता बहारिनच्या पर्ल चौकात जाऊन धडकले आहे. टय़ुनिशियात पडलेल्या क्रांतीच्या या ठिणगीने आता वणव्याचे स्वरूप घेतले असले तरी टय़ुनिशिया आणि इजिप्तमध्ये जेवढय़ा शांततेने सत्तांतर झाले. तसेच ते इतरत्रही होईल, या भ्रमात राहण्यात अर्थ नाही....
Full story

बुद्धीच्या दैवताला अडाणीपणाचे प्लास्टर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या याचिकेवर गणपतीची मूर्ती मातीची असावी, असा निकाल दिला जाणे, हा धर्माची बूज राखणारा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले गेले. याउलट हिंदू धर्माची सारी मक्तेदारी केवळ आपल्याकडेच असल्याचे मानणा-या नेत्यांनी त्यावर आपल्या नेहमीच्या भाषेत गरळ ओकायला सुरुवात केली. मूर्तीकारांनी आतापर्यंत तयार झालेल्या तीस कोटी रुपयांच्या मूर्तीचे काय करायचे, असा टाहो फोडला गेला. सामान्य गणेशभक्ताला मात्र गणेशोत्सवात हरवत चाललेले मांगल्य पुन्हा येईल, अशी आशा आहे....
Full story

हर फिक्र को धुँए मे..

तंबाखू खाऊन आणि दिवसाला दहा-दहा सिगारेटी ओढूनही तब्येत ठणठणीत असलेली माणसेही जगात आहेत हे खरे, पण ते अपवादात्मक. तंबाखूमुळे शरीराचा -हास होतो, हेच सत्य आहे. तंबाखूमधील निकोटिन हा घटक या व्यसनाला खरा कारणीभूत असतो. हृदयविकार, कॅन्सरसारखे भयंकर आजार, व्याधी होतात, असे सांगूनही आणि माहीत असूनसुद्धा दुर्दैवाने त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात दरवर्षी तंबाखूपायी दहा लक्ष लोक मृत्यू पावतात. याचा अर्थ दररोज 3000 लोक मरतात. ते स्वत: जगाचा निरोप घेतात, पण अनेकांचे आरोग्य (पॅसिव्ह स्मोकिंगद्वारे) कायमचे बरबाद करून जातात. ...
Full story

बाबांच्या आमदारकीसाठी खूषमस्क-यांची धांदल

मुख्यमंत्र्यांसाठी विधान परिषदेवरच निवडून येणे कसे सोयीस्कर आहे, हे सांगण्यासाठी काही जण सातत्याने आपले बोरू झिजवताना दिसतात. त्यासाठी चांगल्या- वाईटाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही. राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य गुरुनाथ कुलकर्णी यांचा दुर्दैवी मृत्यू होऊन आठवडा उलटायच्या आतच त्यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांसाठी आणखी एक जागा कशी रिक्त झाली आहे, याच्याच रकाने भरून बातम्या लिहिल्या गेल्या. या सगळ्यातून मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांच्या खूषमस्क-यांनाच त्यांच्या आमदार होण्याची धांदल झाली आहे, यापेक्षा वेगळा ‘अन्वयार्थ’ कोणता निघणार?...
Full story

सामान्यांच्या मानवी हक्कांचे काय?

एकटय़ा गडचिरोली जिल्ह्यातच आजवर हजारो निरपराध लोक मारले गेलेत. हिंसाचारात मृत्यू पडलेल्या पोलिसांची संख्याही दुर्लक्षिण्याजोगी नाही. आदिवासींच्या उत्थानासाठी हा सशस्त्र संघर्ष आहे, असा माओवाद्यांचा दावा असतो. नक्षल समर्थक कार्यकर्त्यांला न्यायालयाने शिक्षा दिली की, कथित मानवी हक्कवाल्यांना मानवता आठवते. न्यायव्यवस्थेविरुद्ध कंठशोष केला जातो. त्याच्या सुटकेसाठी ‘व्हाईट कॉलर्ड’ लोकांचे समूह रस्त्यावर उतरतात, सुटकेच्या मागणीचे फलक घेऊन मानवी साखळय़ा तयार केल्या जातात; पण शेकडो आदिवासी व पोलिसांच्या मानवी हक्कांचे काय?...
Full story

वाघाला काडीचा आधार

‘प्रोजेक्ट टायगर’सारख्या आदर्श योजनेतून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन वर्षानुवर्षे होत असताना गेल्या दोन दशकांत मात्र वाघांची चोरटी शिकार बेसुमार होत गेली आणि एकामागोमाग एक अभयारण्यातून वाघ नाहीसे होत चालले. या गतीने आणखी काही वर्षात भारतात वाघ पूर्ण नामशेष होण्याचा धोका दिसत असताना एखाद्या दूरचित्रवाहिनीने ‘सेव्ह टायगर’ मोहीम राबवून दोन-चार दिवसात पाच कोटीचा निधी उभारावा, हे उल्लेखनीय आहे. अर्थात हे प्रयत्न अपुरे आहेत. पण तो अंधारातील एक किरणही आहे. ...
Full story

प्रशासन राज्यातले आणि बिहारमधले

महाराष्ट्रात ‘आदर्श’ गृहनिर्माण संस्थेतील गैरव्यवहारात राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमताने स्वस्तात लाटलेल्या जमिनीचे प्रकरण उजेडात आले. त्याच वेळी बिहारमध्ये विधानसभेसाठी मतदान सुरू होते. सारे राज्यकर्ते निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना तेथील वरिष्ठ सरकारी अधिकारी आपापली जबाबदारी पार पाडण्यात व्यग्र होते. बिहारसारख्या मागास म्हणून हिणवल्या गेलेल्या राज्यात जनतेच्या उन्नतीसाठी आपण काय करू शकतो, यावर नोकरशहा चर्चा करत होते. तर महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीअभावी मंत्रालयातील कामकाज थंडावल्याचे दिसत होते. एकाच प्रकारचे प्रशिक्षण मिळालेल्या प्रशासकीय अधिका-यांच्या मनोवृत्तीतला हा फरक धक्कादायक आहे....
Full story