झोपडपट्टीतील मुलांना संगणक प्रशिक्षण
संगणक प्रशिक्षण केंद्रात एक-दीड महिना विद्यार्थीच फिरकत नव्हते. शेवटी आम्ही पालकांना समजावले. त्यामुळे येथे विद्यार्थीसंख्या वाढू लागली. त्यानंतर अचानक महापालिकेच्या मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाने या प्रशिक्षण केंद्राला आक्षेप घेतला. त्यामुळे वर्षभरातच आमच्या संगणक प्रशिक्षण केंद्राला टाळे लागल़े...
नाक्यावर शौचालयाशेजारी असलेल्या कचरापेटय़ा काढल्याने विभागात कच-याची समस्या सतावू लागली. त्यामुळे टीपीएस ६वा रस्ता व एसव्ही रोड यांच्या जंक्शनवर असलेल्या कचरापेटींचा ‘कचरा डेपो’ झाला. रोजच्या रहदारीला विशेषत: शाळकरी मुलांना याचा त्रास जाणवू लागला़ याबाबत काय करता येण्यासारखे आहे. याचा अभ्यास सुरू झाला़ त्यातून असे कळले की, विभागातून येणारा कचरा हा मिश्र स्वरूपाचा असतो़ हा कचरा जर सुका आणि ओला असा वेगळा केला तर यातून कचरा वेचकांना आमदनी होऊ शकते आणि उर्वरीत ओला कचरा कचरापेटीत सामावू शकतो़ आम्ही महापालिकेकडे कचरापेटी दत्तक देण्याची मागणी केली. यासाठी पुन्हा आम्हाला महापालिकेच्या सीमा रेडकरांचे सहाय्य मिळाले. महापालिकेने होकार दिला. कचरापेटीशेजारच्या समता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटून कचऱ्याच्या समस्येवर आम्ही करत असलेल्या उपायाविषयी सांगून सहकार्याची मागणी केली. तेव्हा बँकेने बांधकामासाठी लागणारे थोडे साहित्य दिले.
त्यावेळचे नगरसेवक बाळा चव्हाण यांनीही मदत केली. कामगारांच्या मजुरीचे पैसे आसपासच्या दुकानदारांकडून गोळा केले आणि 2004 मध्ये कचरा वर्गीकरण केंद्र सुरू झाले. काही कचरावेचकांना संस्थेचे स्वयंसेवक म्हणून घेण्यात आले. या कचरा वर्गीकरणाच्या प्रकल्पाला सहकार्य म्हणून स्थानिक सोसायटीतील लोकांची प्रगत परिसर व्यवस्थापन समिती संस्थेने स्थापन केली. निर्माल्यापासून गांडुळखत तयार करण्यास सुरुवात केली़ या केंद्राचे उद्घाटन स्वच्छता अभियानाने करण्यात आले. या सर्व कार्यात एच़ पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागाचे सहकार्य अनमोल ठरले. विशेषत: त्यावेळचे एएचएस व आत्ताचे डीवायएचएस जाधव यांचे. हे काम करताना लोकांचे सहकार्य मिळेल, अशी आशा होती. परंतु झाले उलटच. त्याचा त्रास आमच्या स्वयंसेवकांना झाला.संस्थेने शैक्षणिक उपक्रम सुरू करताना अन्य एका बिगर सरकारी संस्थेच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानासाठी शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचे काम आम्हाला दिले. त्यावेळी असे लक्षात आले की, झोपडपट्टीतील मुलांना संगणक शिक्षण घेण्यात अर्थिक अडचणी येत आहेत. त्यांच्याकरता आपण संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे म्हणून आम्ही समाज विकास अधिकारी शलाका चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी आमची ओळख ‘स्टर लाइट फाऊंडेशन’शी करून दिली़ आमच्या एच-पश्चिम विभागाचे अधिकारी अनिल खोजे यांना आमचा उद्देश सांगितल्यावर त्यांनीही शौचालयाच्या वरील भागात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे हे केंद्र सुरू झाले. पण शौचालयाच्या वर असलेल्या या प्रशिक्षण केंद्रात एक-दीड महिना विद्यार्थीच फिरकत नव्हते. शेवटी आम्ही पालकांना समजावले. त्यामुळे येथे विद्यार्थीसंख्या वाढू लागली. त्यानंतर अचानक महापालिकेच्या मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाने या प्रशिक्षण केंद्राला आक्षेप घेतला. त्यामुळे वर्षभरातच आमच्या संगणक प्रशिक्षण केंद्राला टाळे लागल़े ‘स्टर लाइट फाऊंडेशननेही’ केंद्र बंद करण्याचा निर्णय घेऊन फर्निचरसह संगणक संच नेले. परिणामी या केंद्रात अर्धवट शिक्षण घेतलेल्या 70/72 विद्यार्थ्यांकडून केंद्र सुरू करण्याविषयी आमच्याकडे विचारणा होऊ लागली. अशातच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुब्रथो रथ्थो यांची अनौपचारिक भेट झाली. त्यांना आमची अडचण सांगितली. आमचा उपक्रम त्यांना आवडला आणि त्यांनी अधिका-यांशी चर्चा करून या केंद्राला मान्यता देऊन ते सुरू करण्यास सांगितले. तेव्हा आता ते सुरू करण्यासाठी आमच्याकडे संगणक नव्हते. त्यानंतर आम्ही युनायटेड वे या संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला जुने संगणक देण्याचे मान्य केल़े त्याप्रमाणे 2005 मध्ये आम्ही स्वत:चे त्रिरत्न संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केल़े यंदा या केंद्रची पुनर्रचना करण्यात आली असून त्यासाठी स्टेट बँकेने सहकार्य केले. त्यामुळे आता येथे नवे संगणक आले आहेत.
